सोलापूरचे शिवार झाले 'जलयुक्त'

By admin | Published: July 21, 2016 03:09 PM2016-07-21T15:09:57+5:302016-07-21T15:09:57+5:30

खूप दिवसाच्या प्रतिक्षेनंतर आलेल्या पावसामुळे सोलापूर शहर-जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले असून गेल्या २४ तास १०६ मिलिमिटर पाऊस पडल्याची नोंद हवामान खात्याकडे झाली आहे़

Solapur gets water-soluble | सोलापूरचे शिवार झाले 'जलयुक्त'

सोलापूरचे शिवार झाले 'जलयुक्त'

Next

शिवाजी सुरवसे

सोलापूर, दि. २१ : खूप दिवसाच्या प्रतिक्षेनंतर आलेल्या पावसामुळे सोलापूर शहर-जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले असून गेल्या २४ तास १०६ मिलिमिटर पाऊस पडल्याची नोंद हवामान खात्याकडे झाली आहे़. जिल्ह्यात एकूण ८९ महसूली सर्कल असून यातील १७ सर्कलमध्ये दमदार पाऊस झाला आहे़ ११ सर्कलमध्ये २५ टक्केपेक्षा कमी पाऊस झाला आहे़ जलयुक्त शिवार अभियानात सोलापूर जिल्ह्याने राज्यात चांगले काम केले असून यामुळे अनेक गावातील शिवारे जलयुक्त झाली आहेत़ यामुळे निश्चित भूजल पातळी वाढणार आहे़

गेल्यावर्षी २८० गावामध्ये जलयुक्त शिवार अभियानातून कामे झाली तर यंदाच्या वर्षी २६५ गावात जलयुक्तची कामे सुरू आहेत़ गतवर्षी तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी जलयुक्तवर खूप फोकस केल्यामुळे या अभियानात झालेल्या कामाचे परिणाम आता दिसू लागले आहेत़ गतवर्षी १ लाख २५ हजार ५७० हेक्टर क्षेत्राची बांधबंदिस्ती केली आहे़ ३४३ पाझर तलावांची दुरुस्ती केली अहे, १० केटी वेअर बसविले आहेत, ५१३ साखळी बंधारे केले आहेत, ४३८ शेततळी केली अूसन २३८ अनघड दगडाचे बांध बांधले आहेत़ ६६२ माती नाला बांध केले आहेत़ या परिसरात आणखी चांगला पाऊस झाला तर या केलेल्या कामामुळे ४८० टीसीएम एवढे पाणी साठवण होईल असा प्रशासनाचा दावा आहे़ त्यामुळे जलयुक्त शिवार अभियान जिल्ह्यासाठी लाभदायक ठरणार आहे़

महसूली सर्कलनिहाय झालेला पाऊस मिमिमध्ये :....
उत्तर सोलापूर तालुका- सोलापूर सर्कल-१०५ , शेळगी-४०, मार्डी ६६, वडाळा-९५, तिऱ्हे ३८़
दक्षिण सोलापूर तालुका- वळसंगी-५८, मुस्ती-५३, बोरामणी-७०,मंद्रुप-३३, होटगी-८५, विंचूर-२५, निंबर्गी २३़
बार्शी तालुका-बार्शी-३१, खांडवी-३०, आगळगाव-८, वैराग-११, उपळे दुमाला-४, गौडगाव-३०, पांगरी-४, पानगाव-२७, नारी-१०, सुर्डी ४४
अक्कलकोट तालुका-अक्कलकोट-१३५, वागदरी-१८, चपळगाव-३८,मैंदर्गी-७४, दुधनी-८९, जेऊर-४६,तडवळ-१३, करजगी-१८,किणी-५०
मोहोळ तालुका- मोहोळ- ११२, वाघोली २५,कामती बु ३, शेटफळ १०, सावळेश्वर१२, नरखेड ६३, पेनूर ३७, टाकळी सिंकदर ४
माढा तालुका- माढा ४८, रांजणी २५, मोडनिंब ४५, लहुळ ४४, दारफळ ३६, कुर्डूवाडी ४१, रोपळे ५, टेंभूर्णी ३२, म्हैसगाव-१६
करमाळा तालुका- करमाळा ६, कोर्टी ०, केत्तूर १३, केम ४७, जेऊर ३२, उमरड ४, सालसे २१, अर्जूनगर १६,
पंढरपूर तालुका- पंढरपूर ३७, कासेगाव २७, तुंगत १७, भाळवणी २७, पुळूज ३३, चळे २२, करकंब ९, पटवर्धन कुरोली १८, भंडीशेगाव ३२़

   
सांगोला तालुका- सांगोला ४१, हतिद १८, कोळा २१, नाझरा १५, महुद बु १५, संगेवाडी ३०, शिवणे २८, सोनंद २७, जवळा ६
माळशिरस तालुका- माळशिरस १४, महाळूंग १२, लवंग २, सदाशिवनगर १०, वेळापूर ३,पिलीव ६, इस्लामपूर १०, नातेपुते ०, अकलूज १७, दहिगाव ३,
मंगळवेढा तालुका-मंगळवेढा-८२, बोराळे-१५, मरवडे २, हुलजंती ७, भोसे २१, अंधाळगाव २१, मारापूर २०़
......
इथे कमी पाऊस
नातेपुते, मंगळवेढा, टाकळीसिकंदर, जावळा, वेळापूर, पिलीव, शेटफळ, कामती, हुलजंती, रोपळे या महसुली मंडळामध्ये (सर्कल) मध्ये २५ टक्के पेक्षा कमी पाऊस झाला आहे़ माढा, लऊळ, मोडनिंब, बार्शी, गुंजेगाव, अकलूज, मोहोळ, नरखेड, सावळेश्वर, वडाळा, मार्डी, मुस्ती, बोरामणी, होटगी, अक्कलकोट, दुधनी, १६ सर्कलमध्ये १०० टक्केपेक्षा पाऊस झाला आहे़ १७ महसूली सर्कलामध्ये २५ते ५० टक्के दरम्यान पाऊस झाला तर १४ सर्कलामध्ये ७५ टक्केपर्यंत पाऊस झाला आहे़

Web Title: Solapur gets water-soluble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.