सोलापूर-नगर येथिल 'माळढोक' प्रश्न मार्गी

By admin | Published: December 30, 2015 05:19 PM2015-12-30T17:19:13+5:302015-12-30T17:19:13+5:30

माळढोक अभयारण्याची सीमा १२२९चौ किमीवरून आता ४०० चौ किमीवर करण्यात येणार आहे. अशी माहीती केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज दिली.

Solapur-Nagar town will have 'Maldhok' question | सोलापूर-नगर येथिल 'माळढोक' प्रश्न मार्गी

सोलापूर-नगर येथिल 'माळढोक' प्रश्न मार्गी

Next

ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. ३०  -  माळढोक अभयारण्याची सीमा १२२९चौ किमीवरून आता ४०० चौ किमीवर करण्यात येणार आहे.  अशी माहीती केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज दिली. मागील काही दिवसापासून  सोलापूरसह नगर जिल्हयातील शेतकऱ्यांच्या समस्येचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आल्याचं समजते आहे. 
सोलापूर- नगर जिल्हयातील जमिनी माळढोकच्या नावावर  आरक्षित करून तशा नोंदणी तहसीलदारांनी उतार्‍यावर केल्या आहेत. त्यामुळे जमिनीचा खरेदी-विक्री व्यवहार रखडल्याने शेतकर्‍यांसह उद्योजकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत होता.
सोलापूर जिल्हयातील मोहोळ, माढा, उत्तर सोलापूर, करमाळा यासह कर्जत या ठिकाणचे ३८४ हेक्टर क्षेत्राबाबत सावकर समितीने शिफारस केली असून राज्य शासनाने ८४९६.४४ कि. मी. क्षेत्र शिफारस केली होती. यात १२२९.२४ चौ. कि.मी. क्षेत्रासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार प्रांताधिकार्‍यांनी ४८०.२९ हेक्टर हे सुधारित क्षेत्र आहे. माळढोकसाठी क्षेत्र आरक्षित केल्याने जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार तर रखडले आहेतच, त्याचबरोबर बांधकामेही रखडली आहेत.  

Web Title: Solapur-Nagar town will have 'Maldhok' question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.