सोलापूरला गौण खनिजमधून मिळाले तब्बल १४८ कोटी रुपये
By admin | Published: March 3, 2017 06:15 PM2017-03-03T18:15:22+5:302017-03-03T18:15:22+5:30
सोलापूरला गौण खनिजमधून मिळाले तब्बल १४८ कोटी रुपये
सोलापूरला गौण खनिजमधून मिळाले तब्बल १४८ कोटी रुपये
आॅनलाईन लोकमत सोलापूर : शिवाजी सुरवसे
सोलापूर दि़ ३ - करमणूक कर, श्तकऱ्यांकडून शासकीय वसूल आणि गौण खनिज वसूली याचा विचार करता जिल्हा महसूल प्रशासने तब्बल १७८ कोटी८९ लाख रुपयांचा महसूल जानेवारी अखेरपर्यंत शासन तिजोरीत जमा केला आहे़ त्यामुळे मार्च अखेर हा आकडा २०० कोटींवर पोहोचण्याची आशा आहे़ यात विशेष म्हणजे गौण खनिज निधीतून शासनाने १०४ कोटींचा इष्टांक दिला असताना तब्बल १४३ टक्के वसूल झाला आहे़ जानेवारी अखेर हा आकडा पाहता १४८ कोटी ७३ लाख रुपये गौण खनिज मधून शासन तिजोरीत जमा झाले आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) रेश्मा माळी यांनी दिली़
वाळू ठेके आणि मुरुम परवाने यातून शासनाला मोठा महसूल मिळतो़ गेल्यावर्षी गौणखनिज मधून १४३ कोटी जमा झाले होते यंदा जानेवारी अखेरस १७८ कोटी ७३ लाख जमा झाले आहेत़ गौण खनिज मधून पंढरपूर तालुक्यातून सर्वाधिक म्हणजेच ४९़६४ कोटींचा, अक्कलकोट तालुक्यातून २७़३८ कोटीचा, दक्षिण सोलापुरातून २१़२३ कोटींचा, मंगळवेढ्यातून २१ कोटींचा, मोहोळ तालुक्यातून १४ कोटी ३४ लाखांचा महसूल मिळाला आहे़ उर्वरीत तालुक्यातून दोन ते चार लाखांचा महसूल मिळाला आहे़ वाळू ठेक्यातून मिळालेला निधीच यामध्ये सर्वाधिक आहे़
शेतसारा, रोजगार हमी योजना कर, शिक्षण कर, अकृषीक सारा आदी प्रकारचे शासकीय कर देखील महसूल यंत्रणेकडून वसूल केले जातात़ गतवर्षी १८़३८ कोटींचा हा कर जमा झाला होता़ यंदा शासनाने ५४़४९ कोटींचा इष्टांक दिला असून जानेवारी अखेर २० कोटी ३१ लाखांचा कर यातून जमा झाला आहे़
करमणूक खात्याला वषार्काठी १६ कोटींचा इष्टांक दिला असून त्यापैकी जानेवारी अखेर ९़८५ कोटी रुपये वसूल झाले आहेत़ सोलापूर शहरातील डिटीएच मधून ७़६४ कोटी रुपयांचा वसुली इष्टांक दिला असून जानेवारी अखेर पाच कोटी वसूल झाले आहेत़ डिटीएच सेवेचे ६़५० कोटी वसूल करण्याचा इष्टांक करमणूक शाखेला दिला आहे जानेवारी अखेर चार कोटी जमा झाले आहेत़ र्उवरीत तालुक्यातून प्रत्येकी सुमारे दोन ते चार लाखांचा करमणूक कर वसूल झाला आहे़
-----------------------------
अशा आहेत जमा रकमा
-गौण खनिज (इष्टांक १०४ कोटी)-१४८ कोटी ७३ लाख जमा
-करमणूक कर (१६ कोटी)-९़८५ कोटी रुपये जमा
-शेतसार, शिक्षण व रोहयो कर (५४ कोटी)-२०़३१ कोटी जमा
--------------------------------
तालुका गौण खनिज निधी, शेतसारा अन् करमणूक कर
-उत्तर सोलापूर४़७१ कोटी६़५८ कोटी९़८६ लाख
-दक्षिण सोलापूर२१़२३ कोटी३़९० कोटी १२़१३ लाख
-अक्कलकोट२७़३८ कोटी४० लाख ४़१५ लाख
-बार्शी १़७५ कोटी१़९६ कोटी १९़७६ लाख
-माढा १़५७ कोटी९० लाख ७़५८ लाख
-मोहोळ१४़३४ कोटी९१ लाख १़८२ लाख
-करमाळा१़७१ कोटी १ कोटी ३़३४ लाख
-पंढरपूर४९़६५ कोटी२ कोटी ६़४९ लाख
-मंगळवेढा२१़०६ कोटी २४़५९लाख२़६६ लाख
-सांगोला४़२६ कोटी५६ लाख ८़७२ लाख
-माळशिरस१ कोटी १ कोटी ३़२५ लाख