मनपातील सत्ताधाऱ्यांना सोलापूरकरांनी मूठमाती द्यावी : राजकुमार बडोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2017 06:43 PM2017-02-16T18:43:02+5:302017-02-16T18:43:02+5:30

मनपातील सत्ताधाऱ्यांना सोलापूरकरांनी मूठमाती द्यावी : राजकुमार बडोले

Solapur should give the power to the people in the municipal corporation: Rajkumar Bodoley | मनपातील सत्ताधाऱ्यांना सोलापूरकरांनी मूठमाती द्यावी : राजकुमार बडोले

मनपातील सत्ताधाऱ्यांना सोलापूरकरांनी मूठमाती द्यावी : राजकुमार बडोले

Next

मनपातील सत्ताधाऱ्यांना सोलापूरकरांनी मूठमाती द्यावी : राजकुमार बडोले
सोलापूर: शहराची ओळख ही माजी मुख्यमंत्र्यांचे शहर अशी होती; मात्र ती आता पुसून गेली आहे़ दुर्गंध, घाणीचे शहर, डासांचे शहर अशी प्रतिमा सोलापूरची झाली असून, याला महापालिकेतील सत्ताधारी पक्ष असलेले काँग्रेस-राष्ट्रवादी जबाबदार असल्याची टीका सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केली़ गरीबांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी पालिकेतील सत्ताधाऱ्यांना मूठमाती द्या, असेही आवाहन त्यांनी केले.
बापूजीनगरात भाजपचे उमेदवारांच्या यांच्या प्रचारार्थ बडोले यांची मंगळवारी सायंकाळी सभा आयोजित केली होती, त्यावेळी ते बोलत होते़ व्यासपीठावर भाजप शहराध्यक्ष प्रा़ अशोक निंबर्गी, माजी आमदार नरसिंग मेंगजी, रामचंद्र जन्नू यांच्यासह उमेदवार उपस्थित होते़
बडोले म्हणाले की, सोलापुरातील मागील मंत्र्यांनी शहरात काही केले नाही; मात्र स्वत:चे नाव मोठे केले़ लोधी आणि मोची समाज हा प्रामाणिक आणि कष्टाळू आहे; मात्र त्यांच्या स्वप्नांना या काँग्रेस-राष्ट्रवादीने मूठमाती दिली आहे़ केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकार यांनी गोरगरिबांसाठी रमाई घरकूल, पंतप्रधान निवास योजना आदी अनेक योजना आणल्या आहेत़ त्यामुळे प्रत्येक योजनेत पैसे खाणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीला बाजूला ठेवा़ त्यामुळे महापालिका निवडणुकीत जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे़ विविध कामे करण्यासाठी तसेच शहराचा विकास करण्यासाठी भाजपला साथ देण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले़.

Web Title: Solapur should give the power to the people in the municipal corporation: Rajkumar Bodoley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.