सोलापूर स्मार्ट सिटीची वेबसाईट होणार थ्रीडी
By admin | Published: July 20, 2016 10:48 PM2016-07-20T22:48:58+5:302016-07-20T22:48:58+5:30
स्मार्ट सिटी योजनेची वेबसाईट आकर्षक दिसण्यासाठी थ्रीडी इफेक्ट देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सोलापूर महानगरपालिकेचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्यानंतर स्मार्ट सिटी
राजकुमार सारोळे
सोलापूर : स्मार्ट सिटी योजनेची वेबसाईट आकर्षक दिसण्यासाठी थ्रीडी इफेक्ट देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
सोलापूर महानगरपालिकेचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्यानंतर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. या कंपनीच्या नावे स्वतंत्र वेबसाईट सुरू करण्यात आली. ही वेबसाईट अधिक आकर्षक दिसण्यासाठी स्मार्ट सिटी प्रस्तावातील प्रकल्पांच्या छायाचित्रांना थ्रीडी इफेक्ट देण्याचे काम सुरू आहे. आठवडाभरात हे काम पूर्ण होणार आहे. वेबसाईटमध्ये थ्रीडी इफेक्ट दिल्यानंतर स्मार्ट सिटी प्रोजेक्टला अधिक चांगला लूक येणार आहे. स्मार्ट सिटी प्रोजेक्टमध्ये अत्याधुनिकतेला अधिक वाव देण्यात आला आहे. त्यामुळे याची सुरुवातच वेबसाईटपासून करण्यात आली आहे. देशभरातील नागरिक ही साईट पाहणार असल्याने सोलापुरातील वेगवेगळे प्रोजेक्ट त्यांना वेगळा पद्धतीने पाहता येणार आहेत. यात भुईकोट किल्ला, सिद्धेश्वर तलाव परिसर, शिवाजी चौक, जुना पुणे नाका, चार हुतात्मा, इंद्रभुवन परिसराचा समावेश आहे.
सीईओ मिळाला....
दरम्यान, स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीला सीईओ नसल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. कंपनीचे कामकाज ठप्प झाल्याचे वृत्त प्रथम लोकमत आॅनलाईनवर प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेत कंपनीचे अध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी सीईओचा तात्पुरता पदभार महापालिकेचे उपायुक्त श्रीकांत मायकलवार यांना देण्यात येत असल्याचे आदेश बुधवारी काढले. त्यामुळे कंपनीच्या नियोजित ३0 जुलै रोजीच्या बैठकीची नोटीस काढण्याची अडचण दूर झाली आहे.