सोलापूर : मतमोजणीस प्रारंभ, त्रिशंकू परिस्थिती, भाजप-शिवसेनेचे उमेदवार आघाडीवऱ़़
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2017 10:04 AM2017-02-23T10:04:46+5:302017-02-23T10:04:46+5:30
सोलापूर : मतमोजणीस प्रारंभ, त्रिशंकू परिस्थिती, भाजप-शिवसेनेचे उमेदवार आघाडीवऱ़़
सोलापूर : मतमोजणीस प्रारंभ, त्रिशंकू परिस्थिती, भाजप-शिवसेनेचे उमेदवार आघाडीवऱ़़
आप्पासाहेब पाटील : आॅनलाईन सोलापूर
सोलापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुक मतमोजणीस प्रारंभ झाला आहे़ महापालिकेसाठी रामवाडी गोदामात मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली आहे़ तर जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठीची मतमोजणी त्या त्या तहसिल कार्यालय परिसरातील शासकीय गोदामात सुरू करण्यात आली आहे़ प्रारंभीची परिस्थिती पाहता महापालिकेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़ कोणत्याही पक्षाला एकहाती सत्ता येणार नाही हे मात्र नक्की आहे़
दरम्यान, मतमोजणीच्या सुरूवातीस टपाली मतदान मोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे़ सकाळी ७ वाजल्यापासूनच मतमोजणी केंद्रावर केंद्राध्यक्षांनी मतमोजणीच्या तयारीस सुरूवात केली आहे़ महापालिकेसाठी पहिल्या फेरीत ८,९, १, ४, १२, १६, १९, २२ या प्रभागाची मतमोजणीस प्रारंभ होणार आहे़ साधारण: तीन ते चार दिवसात महापालिकेचा निकाल हाती येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़ मतमाजेणीच्या सुरूवातीस टपाली मतदान मोजण्यात आले़ त्यात प्रभाग ८ मधील १६ टपाली मते बाद झाली़
महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी तीन फेऱ्यात व तीन तासात सर्व जागांचा निकाल घोषित होईल, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी दिली. महापालिकेच्या १०२ जागांसाठी मंगळवारी मतदान झाले होते. शहरातील ८९६ मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया शांततेत पार पडली. यात ६२३ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. २६ प्रभागांसाठी ९ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे़ या ईव्हीएम मशीन रामवाडी गोदामातील स्ट्राँगरूममध्ये सीलबंद ठेवण्यात आल्या होत्या़ या गोदामाभोवती पोलिसांचा खडा पहारा ठेवण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास या मशीन बाहेर काढण्यात आल्या आहेत़ प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे मतमोजणीसाठी प्रत्येकी १५ टेबलवर मतमोजणी होत आहे़ प्रत्येक प्रभागासाठी साधारणपणे तीन फेऱ्यात निकाल जाहीर होणार आहे. अशा तीन फेऱ्यात सर्व मतमोजणी पूर्ण होणार आहे़
असे असेल मनपातील पक्षनिहाय संख्याबळ
भाजप 32 ,
काँग्रेस 28 ,
शिवसेना 25 ,
राष्ट्रवादी 08 ,
माकप बसपा व इतर 09