संगणकीकृत ७/१२ नोंदीमध्ये सोलापूर टॉपवऱ़़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2017 03:53 PM2017-03-02T15:53:58+5:302017-03-02T15:53:58+5:30

अजित रेळेकर : ११़६८ लाख उताऱ्यांपैकी ७़७९ लाख उताऱ्यांच्या संगणकीकृत नोंदी झाल्या प्रमाणित

Solapur topped the computerized 7/12 records | संगणकीकृत ७/१२ नोंदीमध्ये सोलापूर टॉपवऱ़़

संगणकीकृत ७/१२ नोंदीमध्ये सोलापूर टॉपवऱ़़

googlenewsNext

संगणकीकृत ७/१२ नोंदीमध्ये सोलापूर टॉपवऱ़़

सोलापूर: शिवाजी सुरवसे
राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकरण कार्यक्रमामध्ये सोलापूर जिल्ह्याने एकूण ११ लाख ६८ हजार ८८५ सात बारा उताऱ्यांपैकी ७ लाख ७९ हजार ५४४ उताऱ्यांच्या नोंदी संगणकीकरणाद्वारे प्रमाणित केल्या आहेत़याबाबतीत पुणे विभागातील पाच जिल्ह्यात सोलापूरचे काम प्रथम क्रमांकावर आहे हे विशेष़
राज्यातील ३५ जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम सुरू झाला आहे़ गतवर्षापर्यंत ई-फेरफार करण्यासाठी इंटरनेट, संगणक तसेच सॉप्टवेअरचे अनेक अडचणी असल्यामुळे आणि त्यात तलाठी व मंडल अधिकाऱ्यांना हे काम करण्यास रस नसल्यामुळे आॅनलाईन सात बारा करण्यासाठी विलंब लागला़ सात बारा दुरुस्त करण्यासाठी रितसर फेरफार तहसीलदारांनी मंजूर केल्यानंतरच दुरुस्त करता येते़ जिल्ह्यात सात बारा उताऱ्यांची संख्या खूप आहे त्यामुळे पुणे विभागातील इतर जिल्ह्यांच्या सात बारा नोंदीची तुलना करता सोलापूर जिल्ह्यातील सात बारा उतारे फेरफार सह प्रमाणित करण्याचे काम खूप जास्त आहे़ ई-फेरफारसाठी राज्यातील २० तालुके निवडले गेले होते यामध्ये एकट्या सोलापूर जिल्ह्यातील आठ तालुक्यांचा समावेश आहे़
जिल्ह्यात ११ लाख ६८ हजार ८८८५ सात बारा उतारे आहेत़ यातील सात लाख ७९ हजार ५४४ एवढे उतारे एडिट मॉड्युल मध्ये तयार केले असून हे काम ६७ टक्के आहे असे रेळेकर म्हणाले़ आता खरेदी विक्री व्यवहार झाल्यानंतर म्हणजेच दस्त नोंदविल्यानंतर त्याचा इंडेक्स आपोआप तहसीलदारांना जातो़ त्यानुसार तलाठ्यांना तो इंडेक्स आपोआप तहसीलदारांकडून जातो आणि तलाठी नोटीस काढतो १५ दिवसानंतर मंडल अधिकारी या नोंदी प्रमाणित करतात़ काही ठिकाणी सॉप्टवेअरच्या अडचणी अजूनही आहेत त्यामुळे तलाठ्यांचे याबाबत प्रशिक्षण घेतले जाणार असल्याचे रेळेकर यांनी सांगितले़ पुणे जिल्ह्याचे काम ५८ टक्के आहे़ सातारा ५५़२७ टक्के, सांगली २३ टक्के, कोल्हापूर ६७ टक्के (कोल्हापूरचे उतारे सोलापूर पेक्षा कमी आहेत)़ राज्याचा विचार केला असता हिंगोली जिल्ह्याचे काम ९५ टक्के एवढे झाले आहे़ उस्मानाबाद (९४़१० टक्के ), वाशिम ( ९४़०२ टक्के ), गोंदिया (९३़९२), गडचिरोली (९३़९४ टक्के) या मागास जिल्ह्याने देखील जोरदार काम केले आहे़

--------------------------
संगणकीकृत सात बारा उतारे नोंदविण्यात आणि ते प्रमाणित करण्यात सोलापूर जिल्ह्याचे काम पुणे विभागात सरस आहे़ ६७ टक्के काम पूर्ण झाले असून मार्च अखेर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे काम १०० टक्के पूर्ण होईल़ तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांना गावनिहाय आढावा घेऊन फेरफार नोंदी दुरुस्त करण्याचा आदेश दिला आहे़आॅनलाईन फेरफार प्रमाणिकरणाचे काम देखील ९३ टक्के आहे़
अजित रेळेकर
निवासी उपजिल्हाधिकारी, सोलापूर

----------------------------------
तालुकानिहाय एकूण ७/१२ उतारे कंसात प्रमाणिक केलेले उतारे
-अक्कलकोट-९७४०५ (५४४८२)
-उत्तर सोलापूर-१३२२१३ (७२७५४)
-करमाळा-८३८६० (६९८६३)
-दक्षिण सोलापूर-८०४३६ (५३५५२)
-पंढरपूर-१२९४०२ (६८२४५)
-बार्शी-९२९९८ (६९५४२)
-माढा -१०१८४१(६७०९४)
-माळशिरस-१५०५५९ (८३३०८)
-मोहोळ-९५३१३ (८००३४)
-मंगळवेढा-७९५६७ (५६२५१)
-सांगोला-१२३५९१ (१०४४२९)
-एकूण-११६८८८५ (७७९५४४)

Web Title: Solapur topped the computerized 7/12 records

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.