सोलापूर ऊसगाळपाचा नवा विक्रम नोंदविणार
By Admin | Published: March 9, 2015 01:44 AM2015-03-09T01:44:52+5:302015-03-09T01:44:52+5:30
आजवरचा जिल्ह्याचा विक्रम मोडीत काढत यंदा उच्चांकी गाळपाच्या दिशेने ३२ कारखान्यांचे गाळप सुरू आहे. राज्यातील १७८ कारखान्यांनी ६९० लाख मेट्रिक
अरुण बारसकर, सोलापूर
आजवरचा जिल्ह्याचा विक्रम मोडीत काढत यंदा उच्चांकी गाळपाच्या दिशेने ३२ कारखान्यांचे गाळप सुरू आहे. राज्यातील १७८ कारखान्यांनी ६९० लाख मेट्रिक टन गाळप केले असून, त्यात एकट्या सोलापूर जिल्ह्याचा १ कोटी ४० लाख मेट्रिक टन वाटा आहे.
जिल्ह्यात १८५ लाख मेट्रिक टन गाळप होईल, असा साखर आयुक्त कार्यालयाचा अंदाज आहे. उजनी व अन्य धरणांचे उपलब्ध पाणी तसेच जलसंधारणाच्या कामांमुळे ऊस लागवड वाढली आहे. तर १९९८-९९ मध्ये साखर कारखान्यांची संख्या १२ होती, ती आता ३५ इतकी झाली आहे. भीमा नदीवरील उजनी धरणाचे पाणी बोगद्याद्वारे सीना नदीत सोडल्याने नदीकाठही ऊसमय झाला आहे. १५ एप्रिलपर्यंत हंगाम सुरू राहील, अशी स्थिती आहे. जिल्ह्यात १९९८-९९ मध्ये ५६.३५ लाख मेट्रिक टन गाळप झाले होते. तोच आकडा २०१३-१४ मध्ये १०२.१२ लाख मेट्रिक टनावर गेला होता.