Solapur ZP Election - आमदार पुतण्याचा पराभव, शिंदे पुत्र विजयी
By admin | Published: February 23, 2017 11:49 AM2017-02-23T11:49:51+5:302017-02-23T12:14:54+5:30
सोलापूर जिल्हा परिषदेमधील मानेगाव गटात तीन दोन आमदार पुत्र आणि आमदार पुतण्या जिल्हापरिषदेच्या रणांगणात उतरल्याने याकडे जिल्याचे लक्ष लागले होते.
Next
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि, 23 - सोलापूर जिल्हा परिषदेमधील मानेगाव गटात तीन दोन आमदार पुत्र आणि आमदार पुतण्या जिल्हापरिषदेच्या रणांगणात उतरल्याने याकडे जिल्याचे लक्ष लागले होते. विद्यमान आमदार तानाजीराव सावंत यांचा पुतण्या पृथ्वीराज सावंत यांचा आमदार बबनराव शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांनी १५९१ मतांनी पराभव केला़. तर माजी आमदार धनाजीराव साठे यांचा मुलगा दादा साठे तिस-या क्रमांकावर फेकले गेले़.
राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. तीन आमदाराचे नातेवाईक मैदानामध्ये असल्यामुळे सर्वांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. 21 तारखेला सोलापूर जिल्हापरिषदेसाठी मतदान झाले होते.
सोलापूर जिल्हापरिषदेत प्रथमच कमळ फुलले आहे. बार्शीतील उपळाई गटात भाजपाचे अविनाश मांजरे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा 100 मतांनी पराभव केला.
- मानेगाव जिल्हा परिषद गट - अरविंद नाईकवाडे ( रासप ),272 सैारभ भोसले ( अपक्ष ), 190 रणजितसिंह शिंदे (अपक्ष ), 12309 गणपतराव साठे ( भाजप ), 1576 पृथ्वीराज सावंत ( शिवसेना ).1717
- मानेगाव पंचायत समिती गण - शारदा पाटील ( स्वाभिमानी पक्ष )891, उषा माने ( भाजप ),506 सुजाता राऊत ( राष्ट्रवादी )6004, पार्वती शिंदे ( शिवसेना )4680
- दारफळ पंचायत समिती गण - रोहिदास कदम ( भाजप ),1292 नितीन शिंगाडे ( रासप ),128 बाळासाहेब शिंदे ( ऱाष्ट्रवादी ), 5983 मनोज साठे ( शिवसेना ).5339
- भोसरे जिल्हा परिषद गट - शुभांगी उबाळे ( राष्ट्रवादी )13148, लता बागल ( शिवसेना )7192
- भोसरे पंचायत समिती गण -सुरेश बागल (राष्ट्रवादी)5920 सचिन बागल (शिवसेना)3984
- रोपळे ( क ) पंचायत समिती गण - शहाजी शिंदे ( राष्ट्रवादी ). 4439 तात्यासाहेब गोडगे ( शिवसेना )3383,