Solapur ZP Election - बार्शीमध्ये पहिल्यांदाच फुलले कमळ
By admin | Published: February 23, 2017 12:19 PM2017-02-23T12:19:36+5:302017-02-23T12:19:36+5:30
शिवसेनेचे नाराज माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला होता. त्याचा फायदा भाजपाला झाला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 23 - शिवसेनेचे नाराज माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला होता. त्याचा फायदा भाजपाला झाला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेमधील बार्शीमध्ये पहिल्यांदाच कमळ फुलले आहे. बार्शी तालुक्यातील उपळाई गटात भाजपाच्या अविनाश मांजरे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा 100 मतांनी पराभव करत भाजपाचे तालुक्यात पहिल्यांदाच कमळ फुलवले.
शिवसेनेमध्ये असताना जाणीवपूर्वक अपमानास्पद वागणूक देत, सेना नेतृत्वानेच विधानसभा निवडणुकीत पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत, आपण भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेत असल्याची घोषणा, आमदार राजेंद्र राऊत यांनी केली होती.
मानेगाव गटात तीन दोन आमदार पुत्र आणि आमदार पुतण्या जिल्हापरिषदेच्या रणगणांत उतरल्याने याकडे जिल्याचे लक्ष लागले होते. विद्यमान आमदार तानाजीराव सावंत यांचा पुतण्या पृथ्वीराज सावंत यांचा आमदार बबनराव शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांनी १५९१ मतांनी पराभव केला़. तर माजी आमदार धनाजीराव साठे यांचा मुलगा दादा साठे तिस-या क्रमांकावर फेकले गेले़.