सोलापुरी रेडिमेड कपडे देशात अव्वल, प्रतिवर्षी पाचशे कोटींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 01:13 PM2019-11-16T13:13:44+5:302019-11-16T13:16:02+5:30

सोलापुरातील युनिफॉर्मचा व्यवसाय तेजीत; गारमेंट उद्योगाने टाकली कात

Solapuri readymade garments tops the country, with a turnover of Rs.500 crores annually | सोलापुरी रेडिमेड कपडे देशात अव्वल, प्रतिवर्षी पाचशे कोटींची उलाढाल

सोलापुरी रेडिमेड कपडे देशात अव्वल, प्रतिवर्षी पाचशे कोटींची उलाढाल

googlenewsNext
ठळक मुद्देसोलापुरी रेडिमेड कपडे आता संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेत आहेविदेशी मार्केटचे लक्ष वेधून घेण्याकरिता मुंबईत आंतरराष्ट्रीय रेडिमेड कपड्यांचे प्रदर्शन होणारया प्रदर्शनात सोलापुरातील तब्बल ६४ उत्पादक सहभागी होणार

बाळकृष्ण दोड्डी

सोलापूर : होय, सोलापूरकरांसाठी एक गुड न्यूज आहे़ सोलापुरी चादरीनंतर आता सोलापुरी रेडिमेड कपडे जगाची सवारी करायला तयार आहे़ देशाच्या कानाकोपºयातील रेडिमेड कपडे व्यापारी सोलापूर कपड्यांना प्राधान्य देत आहेत़ या उद्योगात तब्बल पाचशे कोटींहून अधिक उलाढाल झाली आहे.

स्कूल युनिफॉर्म आणि कॉर्पोरेट ड्रेसकोडन्सारख्या कपड्यांना मोठी मागणी येत असल्याने येथील रेडिमेड कापड उत्पादक आणखी उत्साहाने व्यापार वृद्धीकरिता विविध उपक्रम तसेच अभियान राबवताहेत़ प्रतिवर्षी येथील गारमेंट उद्योगात तब्बल पाचशेहून अधिक कोटींची उलाढाल होत आहे़ आता त्यांनी जागतिक बाजारपेठांकडे लक्ष केंद्रित केले आहे़येथील रेडिमेड उत्पादकांनी देशी बाजार टाइट केला असून, आता त्यांनी विदेशी मार्केटला टार्गेट केले आहे़ त्यादृष्टीने त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

सोलापुरी रेडिमेड कपडे आता संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेत आहे़ विदेशी मार्केटचे लक्ष वेधून घेण्याकरिता मुंबईत आंतरराष्ट्रीय रेडिमेड कपड्यांचे प्रदर्शन होणार आहे़ १७ ते १९ डिसेंबर दरम्यान गोरेगाव येथे प्रदर्शन होत आहे़ विशेष म्हणजे सदर प्रदर्शन सोलापूर रेडिमेड उत्पादक संघाच्या पुढाकारातून होत आहे़ या प्रदर्शनात देश-विदेशातून तब्बल दीडशे उत्पादक सहभागी होणार आहेत़ या प्रदर्शनात सोलापुरातील तब्बल ६४ उत्पादक सहभागी होणार आहेत़ या प्रदर्शनाकरिता शासनाने अनुदान दिल्याची माहिती सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघाचे संचालक राजू शहा यांनी दिली़ उत्तम कापड, उत्तम स्टिचिंग, मजबूत शिलाई, फिनिशिंग देखील उत्तम तसेच चालू मार्केटपेक्षा किफायतशीर दर यामुळे सोलापुरी रेडिमेड कपड्यांनी देशाच्या बाजारपेठांमध्ये लक्ष वेधून घेत आहे़ आंध्र, मराठा, विदर्भ, गोवा, केरळ, छत्तीसगड, ओडिशा, दिल्ली यासह इतर अनेक राज्यांत सोलापुरी रेडिमेड कपड्यांना मोठी मागणी आहे.

विदेशात सोलापुरी रेडिमेड कपड्यांची चलती
- दुबई येथील कॉर्पोरेट कंपन्यांतील अधिकारी व कर्मचाºयांकरिता सोलापुरात युनिफॉर्म जातो़ दुबईतील बहुतांश टॅक्सी ड्रायव्हरच्या अंगावरील ड्रेसकोड हे सोलापुरी रेडिमेड कामगारांनी शिवलेले आहे़ मध्यंतरी अमित जैन यांच्या फॅक्टरीतून युगांडामधील एअरहोस्टेजमधील कर्मचाºयांना ड्रेसकोड सप्लाय व्हायचा़ येथील दर्शन गारमेंट तसेच इतर गारमेंट फॅक्टरीमधून सध्या दुबई, कतार, उमान, मलेशिया, केनिया, युगांडा, सेनेगल, ट्रान्झानिया यासह इतर अनेक देशांत सोलापुरी युनिफॉर्म्स तसेच फॅन्सी कपड्या मोठ्या प्रमाणात निर्यात होतात़ काही दिवसांपूर्वी युगांडाच्या राजदूत प्रतिनिधीने सोलापूर दौरा केला़ त्यांनी येथील कापड उत्पादक संघाशी चर्चा केली़ येथील उत्पादकांना त्यांच्या देशात व्यापार करण्याचे निमंत्रण दिले़ 

दर्शन युनिफॉर्म्सला देश आणि विदेशातून चांगली मागणी आहे़ येथील अनेक उद्योजक ईस्ट आफ्रिका देशांमध्ये रेडिमेड कपडे मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट करत आहेत़ विदेशी मार्केटमध्ये अजून वाढ झाली पाहिजे़ इतर रेडिमेड कपड्यांपेक्षा सोलापुरी रेडिमेड कपडे खूप मजबूत आणि दर्जेदार आहेत़ त्यामुळे येथील कपड्यांना खूप मोठी मागणी येत आहे़ सोलापुरात वाहतूक व्यवस्था नाही़ विशेषकरून विमानसेवा नाही़ देशातील बडे व्यापारी सोलापुरात येऊ इच्छितात़ पण त्यांना येथून चांगली वाहतूक सेवा मिळत नाही़ विदेशांचीदेखील मोठी अडचण होते़ येथे चांगला स्कोप आहे़ सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे़ याकरिता सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघाने पुढाकार घेतला आहे़ 
- बालाजी शालगर
रेडिमेड कापड व्यावसायिक

Web Title: Solapuri readymade garments tops the country, with a turnover of Rs.500 crores annually

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.