सौर विजेला प्राधान्य

By admin | Published: May 20, 2016 02:08 AM2016-05-20T02:08:37+5:302016-05-20T02:08:37+5:30

कोळशा विजेऐवजी सोलार प्रकल्पाला प्राध्यान्य देणार आहोत यात शेतकऱ्याना प्राधान्य देणार आहोत, असे उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

Solar electricity priority | सौर विजेला प्राधान्य

सौर विजेला प्राधान्य

Next


आव्हाळवाडी : शहर व ग्रामिण जनतेला कचरा प्रकल्प तयार करून वीजनिर्मिती करून वीज देणार आहोत कोळशा विजेऐवजी सोलार प्रकल्पाला प्राध्यान्य देणार आहोत यात शेतकऱ्याना प्राधान्य देणार आहोत, असे उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
वाघोली येथे २२ केव्ही पूर्वरंग स्विचींग उपकेंद्राचे उद्घाटन बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात
आले. यावेळी ते बोलत होते. या उपकेंद्राला १ कोटी ७० लाख रुपये खर्च आला असून यात तीन
वाहिन्या काढण्यात आल्या आहे. यामुळे ३२ हजार ग्राहकाला फायदा होणार आहे. मुळशी विभागात
४६ कोटी पैकी वाघोलीला
३१ कोटीची कामे केली.
कामचुकारपणा केल्यास त्यांना महाराष्ट्रात राहता येणार नाही. कामाचा वेग वाढला पाहीजे.
यंदाच्या दुष्काळी परिस्थीतीने दोन वीजकेंद्र बंद पडल्याने डोंगरी भागातील जनतेला वीज मिळत नाही. या भागात ३२ हजार ग्राहक आहेत सर्वांना फायदा होणार आहे ,असे बावनकुळे म्हणाले.
या प्रसंगी आमदार बाबुराव पाचर्णे म्हणाले, ग्राहकांची
समस्या सोडवण्यासाठी तक्रार निवारण केंद्र उभारावे त्यांना समस्या मांडता येईल.
याप्रसंगी सरपंच संजीवनी वाघमारे, रामदास दाभाडे, वसूंधरा उबाळे, अर्चना कटके, मंदाकिनी जाधवराव, मनोज जाधवराव, कैलास सातव, रोहीदास उंद्रे, दादासाहेब सातव, समिर भाडळे, बाळासाहेब कदम रामदास हरगुडे, प्रवीण काळभोर, सुरेश पलांडे, राजेंद्र पवार, पीएसआय सर्जेराव पाटील आदी उपस्थित होते.
(वार्ताहर)
वीज कर्मचाऱ्यांनी काम करणे बंधनकारक आहे. कामाबाबत कामचुकारपणा केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यासाठी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी पैशाची मागणी केली किंवा काम लवकर केले नाही तर नागरिकांनी मला एसएमएस करून माहिती द्यावी.
- चंद्रशेखर बावनकुळे, उर्जा मंत्री

Web Title: Solar electricity priority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.