सौर ऊर्जेने रेल्वे धावणार स्वस्तात
By admin | Published: October 7, 2015 01:06 AM2015-10-07T01:06:12+5:302015-10-07T01:06:12+5:30
सौर ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करून ती वीज रेल्वे इंजिनला देण्याचा अभिनव प्रकल्प सोलापूरचा युवा अभियंता विठ्ठल आळगुंडगी यांनी साकारला आहे. ‘टेसला क्वाईल’चा वापर
सोलापूर : सौर ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करून ती वीज रेल्वे इंजिनला देण्याचा अभिनव प्रकल्प सोलापूरचा युवा अभियंता विठ्ठल आळगुंडगी यांनी साकारला आहे. ‘टेसला क्वाईल’चा वापर होणाऱ्या या प्रकल्पाला आणखी आकर्षक स्वरूप देऊन, तो रेल्वे मंत्रालयाकडे देण्यात येणार आहे. खासदार शरद बनसोडे यांनी यासाठी पुढाकार घेतला असून, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि रेल्वे विभागाचे उच्च तंत्रज्ञांपुढे सादरीकरण झाल्यानंतर प्रकल्पाचे भवितव्य ठरणार आहे.
विठ्ठल यांनी नुकतीच सांगलीच्या अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयातून विद्युत अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. त्यांनी बी. ई.च्या अंतिम वर्षासाठी तयार केलेला ‘वायरलेस सीस्टिम फॉर इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह युसिंग टेसला क्वाईल’ हा प्रोजेक्ट महाविद्यालयात प्रशंसेचा आणि चर्चेचा विषय ठरला.
खासदार बनसोडे यांनी मंगळवारी सकाळी विठ्ठल आणि त्यांच्या प्रोजेक्टला माध्यमांसमोर आणले. (प्रतिनिधी)