तीन जिल्ह्यांसाठी सौर कृषिपंप

By admin | Published: July 31, 2015 01:07 AM2015-07-31T01:07:31+5:302015-07-31T01:07:31+5:30

जालना, बीड उस्मानाबाद जिल्ह्यांचा सौर कृषिपंप वाटप योजनेत समावेश करण्यात आला आहे. तत्काळ वीज जोडणी देणे शक्य नाही, अशांना प्राधान्याने सौर कृषिपंप देण्यात येणार आहेत.

Solar farming for three districts | तीन जिल्ह्यांसाठी सौर कृषिपंप

तीन जिल्ह्यांसाठी सौर कृषिपंप

Next

औरंगाबाद : जालना, बीड उस्मानाबाद जिल्ह्यांचा सौर कृषिपंप वाटप योजनेत समावेश करण्यात आला आहे. तत्काळ वीज जोडणी देणे शक्य नाही, अशांना प्राधान्याने सौर कृषिपंप देण्यात येणार आहेत.
हे कृषिपंप फक्त विदर्भातील शेतकऱ्यांना देण्याचे धोरण युती सरकारने स्वीकारल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. त्याची दखल घेत योजनेत जालना, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार ५८० शेतकऱ्यांना कृषिपंप देण्यात येतील. यंदा केंद्र सरकार देशात १ लाख सौर कृषिपंप वाटणार आहे. त्यासाठी ४०० कोटींची तरतूद केली आहे. राज्यात साडेसात हजार सौर कृषिपंपांसाठी केंद्र सरकार ३० टक्के अनुदानाप्रमाणे १३३ कोटी ५० लाख रुपये देणार आहे, तर राज्य सरकार पाच टक्के रक्कम अनुदान स्वरूपात शेतकऱ्याला देणार आहे. पाच टक्के रक्कम लाभार्थी शेतकऱ्याने उभारावयाची आहे. उर्वरित रक्कम कर्ज स्वरूपात देण्यात येणार आहे. जालना व बीडसाठी प्रत्येकी १९०, तर उस्मानाबादसाठी २०० सौर कृषिपंप देण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्य अभियंता सतीश चव्हाण यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Solar farming for three districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.