ऊर्जा क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या वापराबाबत समाधान
By admin | Published: March 20, 2017 03:56 AM2017-03-20T03:56:25+5:302017-03-20T03:56:25+5:30
महावितरणच्या भांडुप नागरी परिमंडळाला केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाचे सचिव पी.के.पुजारी यांनी भेट देत महावितरणच्या
मुंबई : महावितरणच्या भांडुप नागरी परिमंडळाला केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाचे सचिव पी.के.पुजारी यांनी भेट देत महावितरणच्या कामकाजाचा आढावा घेतला. पुजारी यांनी या वेळी महावितरणच्या भांडुप येथील मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राला भेट दिली आणि या कें द्रात वापरल्या जाणाऱ्या कस्टमर केअर फ्रेमवर्फ सॉफ्टवेअरचे कौतुक केले. शिवाय महावितरणमार्फत केल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाच्या ग्राहकाभिमुक वापराबाबत समाधान व्यक्त केले. या प्रसंगी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार उपस्थित होते.
महावितरणच्या आयपीडीएस प्रोजेक्ट आणि दीनदयाल उपाध्याय योजनेंतर्गत सुरू असणाऱ्या कामाबरोबरच महावितरणच्या माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या विविध सेवा, मोबाइल अॅप, महावितरणची आर्थिक स्थिती याबाबत या वेळी सविस्तर सादरीकरण करण्यात आले, तसेच संजीवकुमार यांनी महावितरणच्या सध्या चालू असलेल्या विविध उपक्रमांची, योजनांची सविस्तर माहिती दिली. या बैठकीला उपस्थित अधिकाऱ्यांशी पुजारी यांनी संवाद साधून विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)