शिवरायांच्या प्रेरणेने प्रश्न सोडवू
By admin | Published: February 25, 2017 11:09 PM2017-02-25T23:09:22+5:302017-02-25T23:09:22+5:30
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आम्हाला महाराष्ट्रात नेत्रदीपक असे यश निवडणुकीत मिळाले आहे. यापुढेही राज्यातील प्रश्न सोडवण्यासाठी
महाड : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आम्हाला महाराष्ट्रात नेत्रदीपक असे यश निवडणुकीत मिळाले आहे. यापुढेही राज्यातील प्रश्न सोडवण्यासाठी शिवरायांच्या प्रेरणेतून आम्ही काम करून राज्याचा विकास करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नुकत्याच झालेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा, पंचायत समितीमधील विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी शनिवारी सकाळी किल्ले रायगडावर आलेले होते.
या वेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आ. प्रशांत ठाकूर, कोकण विभागीय आयकर प्रभाकर देशमुख व जिल्हाधिकारी शीतल उगले, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर आदी उपस्थित होते.
महाड औद्योगिक वसाहतीतील हेलिपॅडवर मुख्यमंत्र्यांचे आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री रायगड किल्ल्याकडे रवाना झाले.
त्यानंतर रोपवेने गडावर येऊन मुख्यमंत्र्यांनी प्रथम मेघडंबरी,
होळीच्या माळावरील शिवपुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर
शिवरायांच्या समाधीस्थळी मुख्यमंत्री नतमस्तक झाले. ‘रायगडच्या
मातीत तेज आणि प्रेरणा आहे, त्यातूनच मला राज्यात रयतेचे
राज्य आणण्याची खरी प्रेरणा
मिळाली आहे. या शिवप्रेरणेतूनच
महाराष्ट्राला प्रगतिपथावर नेऊ,’ असेही फडणवीस यांनी सांगितले. या वेळी राजकारणावर बोलणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)