काही निर्णय अद्याप यायचेत, सरन्यायाधीशांनी आमच्यासाठी सोपे केले; शरद पवारांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 04:39 PM2023-05-11T16:39:02+5:302023-05-11T16:40:13+5:30

राज्यपालांनी जे नुकसान करायचे ते करून गेले. महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांचे नाव राहिल, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजच्या निकालानंतर केली.

some decisions yet to come, the Chief Justice made it easy for us; Sharad Pawar's indicative statement on mla's disqualification, verdict shide thackeray faction | काही निर्णय अद्याप यायचेत, सरन्यायाधीशांनी आमच्यासाठी सोपे केले; शरद पवारांचे सूचक विधान

काही निर्णय अद्याप यायचेत, सरन्यायाधीशांनी आमच्यासाठी सोपे केले; शरद पवारांचे सूचक विधान

googlenewsNext

राज्यपालांची निवड किती चुकीच केली जाते याचे उत्तम उदाहरण महाराष्ट्राने पाहिलेले आहे. मी इच्छा नसताना त्यावर जाहीरपणे बोललो आहे. राज्यपाल पदाची अप्रतिष्ठा कशी केली जाते त्याचे उदाहरण, आता ते इथे नाहीएत त्यामुळे जास्त बोलण्यात अर्थ नाही. राज्यपालांनी जे नुकसान करायचे ते करून गेले. महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांचे नाव राहिल, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजच्या निकालानंतर केली. 

पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. या निकालाची कॉपी वाचूनच त्यावर बोलणे योग्य होईल. त्यातील एक दोन मुद्दे पाहिले, त्यावर कोर्टाने जे आज राज्यकर्ते आहेत त्यांच्यासंबंधी तीव्र भूमिका कोर्टाने मांडली आहे. त्यात एक महत्वाचा निकाल दिसतोय, लेजिस्लेटिव्ह पार्टी ही फायनल नाहीय. ज्या राजकीय पक्षाच्या सूचनेवरून लोक निवडणूक लढवितात, निवडून येतात ती महत्वाची आहे, हे दिसतेय, असे पवार म्हणाले. महाराष्ट्रात जे घडले ते आधीही घडले आहे. कर्नाटक, मध्य प्रदेशमध्ये हेच झालेय, असे पवार म्हणाले. 

काही निर्णय अद्याप यायचे आहेत. अध्यक्षांवर एक महत्वाचा निर्णय सुपूर्द करण्यात आला आहे. त्यामधून अपात्रतेचा विषय एका विशिष्ट काळात निकाली लावावा अशी अपेक्षा कोर्टाची आहे. ज्यावेळेला अध्यक्ष याची भूमिका घेतील त्यावेळी आमचे म्हणणे मांडावे लागेल, असे पवार म्हणाले. 

अध्यक्ष हे एक संस्था आहेत, सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितले आहे. त्याची जबाबदारी असलेल्यांनी त्याचे पावित्र्य जपायची खबरदारी घ्यायला हवी. या संस्थेची आस्था किती आहे ते उद्या काय भूमिका घेतात त्यावरून स्पष्ट होईल, असे पवार म्हणाले. ठाकरेंनी राजीनामा दिला होता यावर मी पुस्तकातही लिहिले आहे. मी म्हटलेय की नाराजी निर्माण झाली होती. ती नाराजीच नव्हती तर वस्तूस्थिती होती हे सर्वोच्च न्यायालयानेही आता स्पष्ट केले आहे. अध्यक्षांना अपात्रतेच्या नोटीशीवर निर्णय घेण्यास तारीख दिलेली नसली तरी लवकर करावे असे म्हटले आहे., असे पवार म्हणाले. सरन्यायाधीशांनी आज जे सांगितलेय ते ऐकल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेला भाजपाकडून सत्तेचा गैरवापर कसा होतो हे सांगणे आमच्यासाठी सोपे झाले आहे, असेही पवार म्हणाले. 
 

Web Title: some decisions yet to come, the Chief Justice made it easy for us; Sharad Pawar's indicative statement on mla's disqualification, verdict shide thackeray faction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.