काही लोकांनी सरकारी ब्रँड बुडविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2016 03:39 AM2016-11-17T03:39:50+5:302016-11-17T07:36:36+5:30
सहकारातील काही मंडळींनी तालुक्यांमध्ये स्वत:चे प्रकल्प सुरू करत, राज्य शासनाचा दुधाचा ब्रँड बुडविला. अनेक राज्यांचे दुधाचे
अहमदनगर : सहकारातील काही मंडळींनी तालुक्यांमध्ये स्वत:चे प्रकल्प सुरू करत, राज्य शासनाचा दुधाचा ब्रँड बुडविला. अनेक राज्यांचे दुधाचे ब्रँड प्रसिद्ध आहेत. आता यापुढे ‘आरेशक्ती’ हा ब्रँड व राज्य सरकारच्या इतर संस्था मोठ्या करण्याचे काम जोमाने करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी खडका फाटा (ता. नेवासा) येथे केले.
पाचशे कोटी रुपये खर्चाच्या पतंजलीच्या दूध प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन फडणवीस यांनी केले. योगगुरू रामदेव बाबा, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, दुग्धविकास व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आदी उपस्थित होते. ‘आरेशक्ती’ हा राज्याचा दुधाचा ब्रँड हा पतंजलीसोबत स्पर्धा करेल. त्यामुळे दुधाला चांगला भाव मिळून शेतकरी समृद्ध होईल. सहकारात आतापर्यंत फक्त काही माणसे मोठी झाली आणि संस्था डबघाईला आल्या. आतापर्यंत दलाल मालक होते, आता शेतकऱ्यांना मालक बनविण्यासाठी प्रक्रिया उद्योगावर भर असेल असेही मुख्यमंत्री
म्हणाले. (प्रतिनिधी)