सर्व प्लॅनिंग उघड केलं तर…; पवारांच्या भेटीनंतर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 02:32 PM2023-11-18T14:32:48+5:302023-11-18T14:33:37+5:30

सत्ताधारी आमदार स्वत:चा मतदारसंघ वाचवण्यासाठी धडपड करतोय असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

Some things have to be hidden in politics, Vijay Wadettiwar's reaction after Sharad Pawar's meeting | सर्व प्लॅनिंग उघड केलं तर…; पवारांच्या भेटीनंतर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

सर्व प्लॅनिंग उघड केलं तर…; पवारांच्या भेटीनंतर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

पुणे - राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत राजकीय चर्चा झाली, परंतु ती माध्यमांसमोर सांगणे योग्य नाही. काही गोष्टी राजकारणात लपवून ठेवाव्या लागतात, सर्वच प्लॅनिंग उघड केले तर समोरच्या माहिती पडेल असं विधान वडेट्टीवार यांनी शरद पवारांच्या भेटीनंतर केले आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. बारामतीत एका कार्यक्रमाला आलो असताना सदिच्छा भेट घेतली, भेटीत राजकीय चर्चा झालीच, पण ती माध्यमांसमोर उघड करणे योग्य नाही. सध्या सत्ताधाऱ्यांची मती भ्रष्ट झालीय, त्यात चुकीनं अनेक पाऊले उचलली जातात. त्यात आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला आहे. महाराष्ट्रात तोंड पाहून दुष्काळ जाहीर केला जातो, ३ पक्षाच्या सरकारमध्ये हे अभिप्रेतच होते. राज्यातील सत्ताधारी आमदार स्वत:चा मतदारसंघ वाचवण्यासाठी धडपड करतोय, महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी नव्हे तर आपला जीव वाचवावा अशी भूमिका सत्ताधाऱ्यांची आहे असा टोला त्यांनी लगावला.

त्याचसोबत पुरोगामी महाराष्ट्रात जात धर्मावरून तेढ निर्माण होणे योग्य नाही. २ समाजात दरी निर्माण होईल आणि महाराष्ट्राच्या इतिहासाला कलंक लागू नये ही भूमिका आहे. प्रत्येकाला त्याचा अधिकार मागण्याचा अधिकार आहे. घटनेनुसार जे आहे ते मिळाले पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध नाही. परंतु ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का नको, आगीत तेल ओतण्याचे काम कुणी करू नये असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.

दरम्यान, सत्तेतील लोक दोन्ही बाजू सांभाळतायेत, राज्यात २८ लाख जणांना कुणबी प्रमाणपत्र दिलंय, ओबीसीत सर्वांना घेणार का. यावर एकच पर्याय राहुल गांधींनी सांगितल्याप्रमाणे राज्यात जातीय जनगणना करावी आणि लोकसंख्येनुसार ज्याचा त्याला वाटा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

Web Title: Some things have to be hidden in politics, Vijay Wadettiwar's reaction after Sharad Pawar's meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.