सैराटबद्दलचे काही झिंगाट मेसेजेस....

By admin | Published: May 12, 2016 05:41 AM2016-05-12T05:41:39+5:302016-05-12T10:35:56+5:30

सिनेमा प्रदर्शित होण्याअगोदरच सैराट का पाहावा याची १७ कारणे? किंवा सैराटमध्ये नेमकं काय असेल? यासारख्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर फिरत होत्या.

Some Zaghat messages about Sairat .... | सैराटबद्दलचे काही झिंगाट मेसेजेस....

सैराटबद्दलचे काही झिंगाट मेसेजेस....

Next
>नामदेव कुंभार
मुंबई, दि. १२ : सैराट हा सोशल मीडियावर गाजणारा पहिला मराठी सिनेमा ठरलाय. सिनेमा प्रदर्शित होण्याअगोदरच सैराट का पाहावा याची १७ कारणे? किंवा सैराटमध्ये नेमकं काय असेल? यासारख्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर फिरत होत्या. २९ एप्रिलला नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट सिनेमा प्रदर्शित झाला आणि अवघं सोशल जग हे सैराटमय झालं. सर्वांनीच या सिनेमाला अक्षरश: डोक्यावर घेतले. या सिनेमाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. ११ दिवसात चित्रपटाने ४२ करोड रुपयांचा गल्ला जमावला आहे. ज्या प्रकारे या सिनेमाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे त्याच प्रमाणे या सिनेमासंदर्भात सोशल मीडियात मेसेजेसही व्हायरल होत आहेत....
 
परश्याने कधीच गुटखा नाही खाल्ला... 
तरी पण तो सल्या आणि लंगड्याच्या आधि मेला 
Moral:- प्रेम is dangerous than गुटखा
 
ओबामा मोदीजी से
ओबामा : इंडिया में क्या चल रहा है
मोदी : फक्त सैराट, झिंग झिंग झिंगाट
 
पक्या -Hello !!! कुठे आहेस रे ??
गण्या - कट्ट्यावर.... का रे ?? 
पक्या -  4 -5 पोरं घेऊन ये माझ्या घरी 
जायचं आहे...
गण्या - का रे ???
पक्या - काय नाय रे 
मेहुणा आलाय घरी
 
मला बाहेर काढा मला सैराट बघायचाय - छगन भूजबळ
 
दुनियादारी मध्ये जितेंद्र जोशी सारखं म्हणायचा.." मेहुणे मेहुणे मेहुण्यांचे पाहुणे "तो अस का म्हणायचा हे सैराट चा शेवट पाहिल्यावर समजलं
आर्चि आणि परश्या वाचले  असते फक्त पळून जाताना हैदराबाद ऐवजी कोकणात यायला पाहिजे होते .......
आम्ही सोय केली असती..... प्रिन्सला काय त्याच्या बापाला पण भेटले नसते
 
सैराट मधल्या लंगड्याच्या 
सपनीला अटक होणार.. 
कारण
महाराष्ट्रात गुटखा बंदी असुन
पण ती गुटखा विकत होती
 
After Sairat कवी ईज back..
 
मेरे लहानपणी थी मेरी भी एक आर्ची....
मेरे लहानपणी थी मेरी भी एक आर्ची....
महाराष्ट्र मे पडा दुष्काळ ईसिलिए 
वडापाव पे नही मिलती तळलेली मिर्ची

ही दुनिया लय खराब आहे राव
यवढ्या पोरी " सैराट " बघुन आल्या
पण एकबी स्वतः I Love you म्हनना
 
आर्ची स्पेशल
ऐका......
हे माझे सखाराम
मी त्यांची रंगू...
हे माझे सखाराम
मी त्यांची रंगू.
कळतय का नाय
का English मध्ये सांगू
 
सैराट पिक्चर बघुन गण्या घरी गेला...............
घरी जाऊन बघतो तर,
मेव्हना चहा पित बसलेला होता.....
गण्या दारातूनच पळुन गेला
 
ह्याच्या माईला सैराट पिक्चर कोणी काढलाय...
आमची पन बायको बुलेट पाहिजे म्हणतिया 
मग मी पण, बोललो...!!
पहिली विहरीत उडी मारुन दाखव मग देतो बुलेट....
 

Web Title: Some Zaghat messages about Sairat ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.