“कोणीतरी म्हणाले आमच्याकडे PM साठी खूप चेहरे, रावणालाच खूप चेहरे असतात”

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 05:44 PM2023-08-31T17:44:23+5:302023-08-31T17:45:04+5:30

२०२४ ला देशाला पुढे नेणारा चेहरा म्हणून नरेंद्र मोदींनी पुन्हा पंतप्रधान करण्याचं जनतेने ठरवले आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

“Someone said we have too many faces for PM, Ravana has too many faces” CM Eknath Shinde Target Uddhav Thackeray | “कोणीतरी म्हणाले आमच्याकडे PM साठी खूप चेहरे, रावणालाच खूप चेहरे असतात”

“कोणीतरी म्हणाले आमच्याकडे PM साठी खूप चेहरे, रावणालाच खूप चेहरे असतात”

googlenewsNext

अहमदनगर – हे सरकार शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे आहे. त्यामुळे अडचणीच्या काळात सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकार खंबीरपणे उभे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात संरक्षण मंत्र्यांनी जी आत्मनिर्भरतेकडे पाऊले उचलली त्यामुळे देशाची ताकद वाढली आहे. आज विरोधी पक्ष सगळे एकत्र आलेत. मोदींसोबत कसं लढायचे याचा विचार करण्यासाठी ते एकत्र आलेत. परंतु आगीशी खेळू नका, तुमचे हात जळतील असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कालपरवा कुणीतरी म्हटलं पंतप्रधानपदासाठी आमच्याकडे अनेक चेहरे आहेत. भाजपाकडे दुसरा चेहरा कोण आहे हे सांगावे. पण अनेक चेहरे कुणाला असतात हे जनतेला माहिती आहे. अनेक चेहरे रावणाला असतात. तिकडे रावण आहेत आणि आपण इकडे जय श्रीरामवाले रामभक्त आहोत अशा शब्दात शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

तसेच देशाचे पंतप्रधान आपल्या देशाचे जगात नावलौकीक वाढवतायेत. आपल्या देशाची अर्थव्यवस्था दहाव्या नंबरवरून पाचव्या नंबर किंबुहना तिसऱ्या नंबरवर आणण्यासाठी प्रयत्न करतायेत. आज जगभरात आपल्या देशाचे नाव आदराने, सन्मानाने घेतले जाते याचे आपण साक्षीदार आहोत. दुसरीकडे द्वेष, मत्सर, एका माणसाच्या विरोधात एकत्र आले आहेत. बॅनरवर त्या लोकांचे चेहरेही दिसत नाहीत. महाभारतात पांडवांचा विजय झाला होता. कौरव पराभूत झाले होते. परंतु २०२४ ला देशाला पुढे नेणारा चेहरा म्हणून नरेंद्र मोदींनी पुन्हा पंतप्रधान करण्याचं जनतेने ठरवले आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्रही नरेंद्र मोदींच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहील. राधाकृष्ण विखे पाटील सहकार क्षेत्राला पुढे नेण्याचे काम केले आहे. विखे पाटलांचे योगदान सर्वश्रूत आहे. सहकार खात्याला पुढे नेण्यासाठी मोदी सरकारमध्ये सहकार मंत्रालय बनवले. शेतकऱ्यांच्या जीवनात चांगला बदल घडला पाहिजे यासाठी सहकार मंत्रालय स्थापन केले आणि त्याचे प्रमुख अमित शाह यांना केले. सहकार क्षेत्रातील अनेक उद्योग अडचणीत आले तेव्हा १० हजार कोटी मदत करण्याचं काम केंद्र सरकारने केले असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

Web Title: “Someone said we have too many faces for PM, Ravana has too many faces” CM Eknath Shinde Target Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.