"मणिपूरसारखं महाराष्ट्रातही काहीतरी..."; पवारांच्या विधानावर भाजप म्हणतं, "विचार जरी केला तरी फडणवीस..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 11:20 AM2024-07-29T11:20:25+5:302024-07-29T11:23:56+5:30

महाराष्ट्रातही मणिपूरसारखं काही घडेल अशी चिंता असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Something like Manipur will happen in Maharashtra too BJP reply after Sharad Pawar statement | "मणिपूरसारखं महाराष्ट्रातही काहीतरी..."; पवारांच्या विधानावर भाजप म्हणतं, "विचार जरी केला तरी फडणवीस..."

"मणिपूरसारखं महाराष्ट्रातही काहीतरी..."; पवारांच्या विधानावर भाजप म्हणतं, "विचार जरी केला तरी फडणवीस..."

BJP Reply to Sharad Pawar : मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारावरुन राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. तसेच महाराष्ट्रातील परिस्थितीबाबतही चिंता व्यक्त करत एकसंघ राष्ट्र निर्माणासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे म्हटलं. यासोबत शरद पवार यांनी महाराष्ट्रामध्येही मणिपूरप्रमाणे हिंसाचार होईल की काय अशी भीती वाटत असल्याचं विधान केलं. त्यांच्या या विधानावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. शरद पवार यांनी राजकारणासाठी हे विधान केल्याचे भाजपनं म्हटलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस हे यासाठी सक्षम असल्याचे म्हटलं. 

नवी मुंबईत डॉ. मंगेश आमले यांनी येथे आयोजित केलेल्या सामाजिक ऐक्य परिषदेमध्ये शरद पवार बोलत होते. मणिपूरमध्ये सामाजिक अशांतता झाल्यानंतर पंतप्रधानांना आपण तिकडे चक्कर टाकावी, लोकांना दिलासा द्यावा असे कधी वाटले नाही. अलीकडच्या काळातही महाराष्ट्रात काही घडेल की काय, अशी चिंता वाटते, असं शरद पवार म्हणाले. पवार यांच्या विधानावरुन चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली.

"महाराष्ट्रात हिंसाचार, जातीय दंगली होतील असं भविष्य शरद पवार यांनी वर्तवलं आहे. शरद पवार यांनी ४० वर्षे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्यांच्या तोंडून अशी वक्तव्ये येत आहेत. महाराष्ट्राची जनता कधीही कोणत्याही हिंसाचाराला समर्थन करत नाही. इथली जनता अशी नाही हे शरद पवार यांनाही माहिती आहे. पण राजकारणासाठी महाराष्ट्राची बदनामी केली जात आहे. पण या महाराष्ट्रात हिंसाचाराचा कोणी विचार जरी केला तरी देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून सक्षम आहेत. माझी शरद पवार यांना विनंती आहे की, राजकारणासाठी महाराष्ट्रात दंगलीच्या गोष्टी करु नका. हे मात्र खरं आहे की, राज्यात काही पक्षाचे लोक समाजात जातीय तेढ निर्माण करुन राजकारण करु पाहत आहेत. लोकसभेतही हेच करण्याचा प्रयत्न केला," असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

काय म्हणाले शरद पवार?

मणिपूरमध्ये जे घडलं तेच आजुबाजूच्या राज्यात घडलं. कर्नाटकात घडले. अलीकडच्या काळातही महाराष्ट्रात काही घडेल की काय, अशी चिंता वाटते. संसदेत मणिपूरमधील हिंसाचाराची चर्चा झाली. मणिपूरमध्ये पिढ्यान-पिढ्या एकत्र असलेला लहानसा प्रांत अस्वस्थ झाला आहे. मणिपूरमध्ये सुसंवाद ठेवणारा समाज आज एकमेकांशी बोलायला तयार नाही. मणिपूरवर एवढं मोठं संकट आल्यानंतरही तिथल्या जनतेला दिलासा द्यावा असं मोदींना वाटलं नाही. मोदींनी मणिपूरकडे ढुंकूनही पाहिलं नाही, अशी टीका शरद पवार यांनी केली.
 

Web Title: Something like Manipur will happen in Maharashtra too BJP reply after Sharad Pawar statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.