मध्य महाराष्ट्राला काहीसा दिलासा

By admin | Published: April 21, 2017 06:05 AM2017-04-21T06:05:07+5:302017-04-21T06:05:07+5:30

विदर्भाच्या तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट आहे़ मध्य महाराष्ट्राच्या काही ठिकाणच्या कमाल तापमानात घट झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे़

Somewhat comforting to Central Maharashtra | मध्य महाराष्ट्राला काहीसा दिलासा

मध्य महाराष्ट्राला काहीसा दिलासा

Next

पुणे : विदर्भाच्या तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट आहे़ मध्य महाराष्ट्राच्या काही ठिकाणच्या कमाल तापमानात घट झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे़ राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे ४५़२ अंश सेल्सिअस तर, सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे १७़४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़
मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे़ कोकण, गोव्यात किंचित वाढ झाली आहे़
देशभरात हरियाना, चंडीगड, दिल्ली, पंजाब येथील अनेक ठिकाणी उष्णतेची लाट सुरू आहे़ हिमाचल प्रदेश, पश्चिम राजस्थान येथील तुरळक ठिकाणी कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे़
पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून कमाल तापमानात घट झाली आहे़ त्याच वेळी कमाल तापमानात २२़२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे़ पुढील दोन-तीन दिवस
कमाल तापमाना ३७-३८ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे़ विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़

राज्यातील प्रमुख शहरांमधील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) पुणे ३९़३, अहमदनगर ४३, जळगाव ४३़७, कोल्हापूर ३५़३़, महाबळेश्वर ३२़६, मालेगाव ४३़८, नाशिक ३८़४, सांगली ३८, सातारा ३९़९, सोलापूर ४२़१, मुंबई ३४़७, अलिबाग ३५़५, रत्नागिरी ३२़५, पणजी ३४़१, डहाणु ३४़९, भिरा ४३, औरंगाबाद ४०़८, परभणी ४३़, नांदेड ४४, अकोला ४४़५, बुलढाणा ४०़५, ब्रह्मपुरी ४४़८, चंद्रपूर ४५़२, गोंदिया ४३़२, नागपूर ४५, वर्धा ४५़, यवतमाळ ४२़५़

Web Title: Somewhat comforting to Central Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.