मुलगा १२ वीत पहिला आला; आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या बापाचा काळाने घात केला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 02:41 PM2023-05-26T14:41:00+5:302023-05-26T14:41:39+5:30

जामनेरपासून काही अंतरावर शहापूरनजीक हा अपघात झाला. त्यात आनंदा भीमराव जगताप यांचा जागीच मृत्यू झाला.

Son came first in School in HSC, father died in an accident while going to celebrate, incident in Jalgaon | मुलगा १२ वीत पहिला आला; आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या बापाचा काळाने घात केला

मुलगा १२ वीत पहिला आला; आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या बापाचा काळाने घात केला

googlenewsNext

जळगाव - गुरुवारी बारावीचा निकाल लागल्याने उत्तीर्ण झालेल्या मुलांच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. मात्र जळगावात घडलेल्या एका दुर्घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. याठिकाणी जामनेर-शहापूर रस्त्यावर मॅजिक गाडी झाडाला आदळून अपघात झाला. त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर १ जण गंभीर जखमी झाला. 

जामनेरपासून काही अंतरावर शहापूरनजीक हा अपघात झाला. त्यात आनंदा भीमराव जगताप यांचा जागीच मृत्यू झाला. तर दीपक शेळके हा गंभीर झाल्याची माहिती आहे. जखमीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून अपघाताची माहिती घेतली. त्यानंतर मृत आनंदा जगताप यांचा मृतदेह पोस्टमोर्टम रिपोर्टसाठी पाठवण्यात आला. 

आनंदावर विरजण पडलं
गुरुवारी दुपारी १२ वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागला होता. त्यात मृत आनंदा जगताप यांच्या मुलाने शाळेत पहिला क्रमांक पटकावला. मुलाचा आनंद साजरा करण्यासाठी आनंदा घरी जात होते. पण वाटेतच काळाने घात केला. मुलगा बारावी पास झाला यासाठी कुटुंबात उत्साह होता. परंतु घरातील कर्ता पुरुष अपघातात गेल्याची बातमी कळताच कुटुंबाला धक्का बसला. या बातमीने गावकरीही हळहळले. 

अपघाताची चौकशी
सध्या पोलिसांनी या अपघाताची नोंद केली असून अपघात नेमका कशामुळे झाला याचा पोलीस तपास करत आहेत. 
 

Web Title: Son came first in School in HSC, father died in an accident while going to celebrate, incident in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात