‘मुलगा आजोबांच्या पक्षात, पण मी वेटिंगमध्ये!’, नितेश राणे यांचे टिष्ट्वट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 04:00 AM2017-10-03T04:00:21+5:302017-10-03T04:00:38+5:30
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नव्या ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात’ कोणत्या पक्षातील कोणता आमदार येणार याबाबत राजकीय आखाडे बांधले जात आहेत
मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नव्या ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात’ कोणत्या पक्षातील कोणता आमदार येणार याबाबत राजकीय आखाडे बांधले जात आहेत. अद्याप पक्षप्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली नसली तरी एका चिमुकल्याने मात्र राणे यांच्या नव्या पक्षाच्या झेंडा आपल्या खांद्यावर घेतला आहे. तो चिमुकला म्हणजे आमदार नितेश राणेंचा मुलगा होय. नितेश राणे यांनी टिष्ट्वटरवर यासंदर्भात माहिती दिली.
‘माझ्या मुलाने माझ्याआधी त्याच्या आजोबांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला आहे. मी अजूनही प्रतीक्षेतच आहे. जय स्वाभिमान!!’, असे नितेश राणे यांनी सोमवारी टिष्ट्वट केले आहे. नितेश राणे तसचे आमदार कालिदास कोळंबकर या राणे समर्थक आमदारांनी नव्या पक्षात प्रवेश केलेला नाही. नितेश राणे कणकवलीतून तर कोळंबकर वडाळा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आहेत.