काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्रास वीरमरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 10:26 PM2020-04-18T22:26:29+5:302020-04-18T22:30:42+5:30

काश्मीरमधील सोपोर भागात सीआरपीएफ व पोलिसांची तुकडी गस्तीवर असतांना दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. चकमकीत तीन जवान शहिद झाले

son of Maharashtra martyr in terrorist attack in Kashmir | काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्रास वीरमरण

काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्रास वीरमरण

Next

पातुर्डा: काश्मिरमधील बारामुल्ला जिल्हयातील सोपोर येथे दहशतवाद्यांशी लढतांना पातुर्डा येथील चंद्रकांत भगवंतराव भाकरे (वय ३८) हा जवान शहिद झाल्याची घटना १८ एप्रिलरोजी संध्याकाळी घडली. 

सोपोर भागात सीआरपीएफ व पोलिसांची तुकडी गस्तीवर असतांना दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. चकमकीत तीन जवान शहिद झाले असून दोघे जखमी झाले आहेत.  शहिद झालेल्या जवानामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील पातुर्डा येथील चंद्रकांत भगवंतराव भाकरे (वय ३८) याच्यासह राजिव शर्मा (वय ४२) रा. वैशाली बिहार, परमार सत्यपाल सिंग (वय २८) रा. साबरकंठा गुजरात यांचा समावेश आहे.

हे तिघेही आपल्या जवानासोबत गस्त घालत होते. तेवढ्यात संध्याकाळी ५.३० वाजेच्या सुमारास दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. चकमकीत तिघे ठार तर अन्य दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. चंद्रकांत भाकरे हे गत १५ वर्षापासून सीआरपीएफमध्ये तैनात होते. ते शेतकरी कुटूंबातील असूून त्यांच्या पश्चात आईवडील व पत्नीसह १ मुलगा, १ मुलगा असा परिवार आहे. चंद्रकांत निधनाची वार्ता गावात कळताच मित्र परिवार एकत्र झाला. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

Web Title: son of Maharashtra martyr in terrorist attack in Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.