सोलापूरात कपड्यांच्या हट्टापायी सहावीतील मुलाची आत्महत्या
By Admin | Published: August 10, 2016 03:58 PM2016-08-10T15:58:09+5:302016-08-10T15:58:09+5:30
घरगुती कार्यक्रमासाठी कपडे न घेतल्याचा रागात सहावीत शिकणा-या समर्थ नागनाथ लिगाडे या सहावीत शिकणा-या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूरात घडली़.
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि.10 - घरगुती कार्यक्रमासाठी कपडे न घेतल्याचा रागात सहावीत शिकणा-या समर्थ नागनाथ लिगाडे या सहावीत शिकणा-या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूरात घडली़.
येथील बसवेश्वरनगर, शेळगीत राहणारा मयत समर्थ त्याची आई आणि मोठा भाऊ अमोल यांच्यासमवेत अक्कलकोट येथे मामाकडे राहण्यास होता. समर्थ हा शहाजी हायस्कुलमध्ये सहावीत शिकत होता.
चार दिवसांपूर्वी तो घरगुती कार्यक्रमासाठी शेळगी येथील त्याच्या काकाच्या घरी आला होता. घरी कार्यक्रम असल्याने त्याने आईकडे नविन कपड्यांसाठी हट्ट धरला होता. परिस्थिती हलाखीची व पैसे नसल्याने आई आणि भाऊ अमोल याने त्यास कार्यक्रम झाल्यानंतर कपडे घेवू असे समजावून सांगितले. मात्र, त्याने त्यांचे न ऐकता रागाच्या भरात समर्थने आतून खोलीची कडी लावून साडीने घरात गळफास लावून घेतला.
या घटनेनंतर बेशुद्ध समर्थ यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तो मयत झाल्याचे डॉ. अभय सालपे यांनी नातेवाईकांना सांगितले. समर्थ यास मृत घोषित केले. या संदर्भात जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक राठोड करत आहेत.