सोनलला ‘कल्पना चावला’ शिष्यवृत्ती
By admin | Published: July 6, 2017 05:13 AM2017-07-06T05:13:10+5:302017-07-06T05:13:10+5:30
अमरावतीच्या २१ वर्षीय सोनल बबेरवाल हिने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला आहे. या विद्यार्थिनीला आंतरराष्ट्रीय अंतराळ
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अमरावतीच्या २१ वर्षीय सोनल बबेरवाल हिने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला आहे. या विद्यार्थिनीला आंतरराष्ट्रीय अंतराळ विद्यापीठाची (इंटरनॅशनल स्पेस युनिव्हर्सिटी) पहिली ‘कल्पना चावला स्कॉलरशिप प्रदान करण्यात आली आहे. आयर्लंडमधील कॉर्क इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीने ही घोषणा केली आहे.
भारताची पहिली महिला अंतराळवीर डॉ. कल्पना चावला यांच्या स्मरणार्थ ही स्कॉलरशिप प्रदान करण्यात येते. फेब्रुवारी २००३मध्ये कोलंबिया अंतराळयानाच्या अपघातात चावला यांचा मृत्यू झाला होता. बुद्धिमान भारतीय महिलांमधील तांत्रिक आणि अंतराळविषयक संशोधन कौशल्य विकसित करणे हे या शिष्यवृत्तीमागील उद्दिष्ट आहे. अंतराळ क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत हा कायमच महत्त्वाचा भाग राहील, असेही यावेळी युनिव्हर्सिटीने म्हटले आहे. विज्ञान, वैद्यकीय वा खगोलशास्त्राशी संबंधित क्षेत्रांतील भारतीय पदव्यत्तर विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करण्याचा कॉर्क इन्स्टिट्यूटचा मानस आहे.
सोनल स्थानिक सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन शाखेच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेत आहे. येथील इलेक्ट्रॉनिक्स विभागाद्वारे आयोजित अंतराळवीर अनिमा पाटील- साबळे यांचा अवकाश विज्ञान या विषयावरील सेमिनार हा खऱ्या अर्थाने सोनलसाठी ‘टर्निंग पार्इंट’ ठरला.