‘सोमेश्वर’च्या उपाध्यक्षपदी गीते

By admin | Published: June 9, 2016 01:35 AM2016-06-09T01:35:37+5:302016-06-09T01:35:37+5:30

सोमेश्वर साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी सिद्धार्थ गिते यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Songs for the 'Someshwar' Vice President | ‘सोमेश्वर’च्या उपाध्यक्षपदी गीते

‘सोमेश्वर’च्या उपाध्यक्षपदी गीते

Next


सोमेश्वरनगर : सोमेश्वर साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी सिद्धार्थ गिते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदासाठी केवळ एकच अर्ज दाखल झाल्याने या ठिकाणी गिते यांची बिनविरोध वर्णी लागली. सोमेश्वर कारखान्याच्या संचालक मंडळाचा गेल्या महिन्यातच एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यानुसार दर वर्षी उपाध्यक्षपदी एकाची निवड याप्रमाणे मावळते उपाध्यक्ष उत्तम धुमाळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा गेल्या महिन्यातच संचालक मंडळाच्या सभेत सादर केला होता. त्यानुसार प्रादेशिक सह संचालकांनी ८ जून ही नवीन उपाध्यक्षनिवडीची तारीख निश्चित केली होती. त्यानुसार, बुधवारी (दि. ८) सोमेश्वर कारखान्याच्या जिजाऊ सभागृहात उपाध्यक्षपदासाठी संचालक सिद्धार्थ गिते यांचाच केवळ एकमेव अर्ज आल्याने प्रादेशिक सह संचालक घोरपडे यांनी गिते यांची निवड झाल्याचे स्पष्ट केले.
या वेळी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, मावळते उपाध्यक्ष उत्तम धुमाळ, संभाजी होळकर, युवकचे अध्यक्ष विक्रम भोसले, संचालक सुनील भगत, नामदेवराव शिंगटे, किशोर भोसले, लालासाहेब माळशिकारे, महेश काकडे, विशाल गायकवाड, शैलेश रासकर, ऋतुजा धुमाळ, कार्यकारी संचालक सुरेश तावरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Songs for the 'Someshwar' Vice President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.