सोनिया-राहुल दीक्षाभूमीवर
By admin | Published: April 12, 2016 02:15 AM2016-04-12T02:15:34+5:302016-04-12T05:43:57+5:30
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गाधी यांनी सोमवारी दीक्षाभूमीला भेट दिली. त्यांनी मध्यवर्ती स्मारकातील तथागत गौतम बुद्धांची प्रतिमा आणि डॉ. बाबासाहेब
नागपूर : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गाधी यांनी सोमवारी दीक्षाभूमीला भेट दिली. त्यांनी मध्यवर्ती स्मारकातील तथागत गौतम बुद्धांची प्रतिमा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यांनी काही वेळ ध्यानसाधनाही केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य डॉ. राजेंद्र गवई, विलास गजघाटे आणि सुधीर फुलझेले यांनी राहुल व सोनिया गांधी यांचे स्वागत करीत त्यांना मध्यवर्ती स्मारकात नेले.
सोनियाजी व राहुल यांनी सर्वप्रथम तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेला व डॉ. आंबेडकरांच्या अस्थिकलशाला पुष्प अर्पण
करीत अभिवादन केले.
त्यानंतर दोघांनीही खाली बसून १० मिनिटे ध्यानसाधना
केली. त्यांनी बोधिवृक्षाला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. (प्रतिनिधी)
दीक्षाभूमीचे स्मृतिचिन्ह भेट
डॉ. आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई आणि सचिव सदानंद फुलझेले यांनी चांदीची प्रतिकृृती असलेले दीक्षाभूमीचे स्मृतिचिन्ह आणि डॉ. आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ भेट स्वरूपात सोनियाजी व राहुल गांधी यांना दिला.
२२ प्रतिज्ञांचे वाचन
डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेताना अनुयायांना दिलेल्या २२ प्रतिज्ञांचा शिलालेख येथे उभारण्यात आलेला आहे. बोधिवृक्षाजवळ सोनिया गांधी या ‘व्हिजिट बुक’मध्ये संदेश लिहीत असताना राहुल
यांनी शिलालेखावरील प्रतिज्ञेचे वाचन केले.
‘हा मैं इन्हे पहेचानती हूँ’
दीक्षाभूमीवरील भेटीदरम्यान ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे सोनिया गांधी यांना स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांची भेट घालून देताना त्यांचा परिचय देऊ लागले. तेव्हा सोनिया गांधी यांनी ‘हा मैं इन्हे पहेचानती हूँ’ असे सांगितले. मी यापूर्वीसुद्धा दीक्षाभूमीवर येऊन गेली आहे. तेव्हा सदानंद फुलझेले यांच्याशी भेट झाली होती, असेही त्यांनी शिंदे यांना सांगितले.
व्हिजिट बुकमध्ये लिहिलेला संदेश
दीक्षाभूमीवर येणे, ही माझ्यासाठी फार मोठी आणि आनंदाची गोष्ट आहे. मी दीक्षाभूमीला माझी सद्भावना अर्पण करते.
- सोनिया गांधी