मुलाच्या धक्काबुक्कीत वडिलांचा मृत्यू

By admin | Published: April 26, 2017 01:52 AM2017-04-26T01:52:06+5:302017-04-26T01:52:06+5:30

किरकोळ कारणावरून चिडलेल्या मुलाने केलेल्या धक्काबुक्कीत बापाचा मृत्यू झाला. ही घटना सासुरे (ता. बार्शी ) येथे घडली. येडाप्पा आवारे (वय ८५) असे मृताचे आहे.

Son's death | मुलाच्या धक्काबुक्कीत वडिलांचा मृत्यू

मुलाच्या धक्काबुक्कीत वडिलांचा मृत्यू

Next

वैराग (जि. सोलापूर) : किरकोळ कारणावरून चिडलेल्या मुलाने केलेल्या धक्काबुक्कीत बापाचा मृत्यू झाला. ही घटना सासुरे (ता. बार्शी ) येथे घडली. येडाप्पा आवारे (वय ८५) असे मृताचे आहे.
सासुरे येथील येडाप्पा आवारे आणि त्यांचा मुलगा विष्णू (वय ६०) यांच्यात संपत्तीवरून वाद होता. २०१४ मध्ये याच कारणावरून वैराग पोलीस ठाण्यात येडाप्पा यांनी विष्णूच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यावरून नेहमी बापलेकामध्ये भांडणे व्हायची. रविवारी रात्री गावात कीर्तन ऐकून घरी परतत असताना, याच कारणावरून पुन्हा बापलेकामध्ये भांडण सुरू झाले. या वेळी झालेल्या धक्काबुक्कीत खाली पडल्याने येडाप्पा यांच्या डोक्यास जबर मार लागला. त्यांना बार्शीच्या जगदाळे मामा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी (दि. २४) दुपारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत त्यांच्या पत्नी पार्वती यांनी वैराग पोलिसांत फिर्याद दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Son's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.