सोनू,तुझा सरकारवर भरवसा नाय का?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2017 02:33 PM2017-08-08T14:33:19+5:302017-08-08T14:35:48+5:30
सोनू, तुझा मायावर भरवसा नाय का ? या गाण्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे
मुंबई, दि. 8- सोनू, तुझा मायावर भरवसा नाय का ? या गाण्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. प्रत्येक जण या गाण्याच्या माध्यमातून काहीना काही विषय मांडू पाहतो आहे. आरजे मलिष्काने मुंबईतील खड्ड्यांवर सोनू गाण्याच्या माध्यमातून टीका केल्यानंतर बरंच वादंग निर्माण झालं होतं. या सोनू गाण्याचा आवाज आता विधानभवनांच्या पायऱ्यांपर्यंत पोहचला आहे. या गाण्याचा आधार घेत विरोधी पक्षांच्या आमदारांनी भाजप-शिवसेना युती सरकारवर जोरदार टीका केली. घोटाळ्यांचे आरोप झालेले गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी या गाण्यातून केली. विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांनी हे आंदोलन केलं.
{{{{twitter_post_id####
विरोधकांनी @bjpprakashmehta व @Subhash_Desai यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सभात्याग केला,सभागृहाच्या आवारात सरकारविरोधी घोषणाबाजी केली. pic.twitter.com/AG1g6isOAd
— NCP (@NCPspeaks) August 8, 2017
भाजप नेते आणि गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर झालेल्या एसआरए घोटाळ्याच्या आरोपानंतर विरोधकांनी विधीमंडळ अधिवेशनात सरकारची कोंडी केली आहे. या मुद्द्यावरून विधानभवनात तसंच विधानभवना बाहेर विरोधकांचा जोरदार गदारोळ बघायला मिळाला. अधिवेशन काळात प्रकाश मेहता यांच्या राजीनामाची मागणी होत असताना मंगळवारी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावरही भूखंड घोटाळ्याचा आरोप झाला आहे. शिवसेनेच्या जवळच्या बांधकाम व्यावसायिकाला लाभ मिळावा यासाठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी मॅग्नेटिक महाराष्ट्रासाठी संपादित केलेल्या ६०० एकर आरक्षित भूखंडातून ४०० एकर जमीन वगळल्याचा आरोप सुभाष देसाईंवर करण्यात आला आहे. त्यामुळं मेहता आणि सुभाष देसाई यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी विधानसभेत केली. सुभाष देसाई यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असले तरी विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. या संपूर्ण गदारोळानंतर विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर विधानसभेच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘सोनू, तुझा सरकारवर भरवसा नाय का?’ असं गाणं गात सरकारवर टीका करण्यात आली.
}}}}सोनू, तुझा सरकारवर भरोसा नाय का? #MonsoonSession#Maharashtra#Resign@bjpprakashmehta@Subhash_Desaipic.twitter.com/9Sp8FSxeC8
— NCP (@NCPspeaks) August 8, 2017
इगतपुरीमधील गोंदेदुमाला येथे एमआयडीसीने संपादीत केलेली ४०० एकर जमीन सुभाष देसाई यांनी मूळ मालकाला परत केली. त्यामुळे सुभाष देसाई यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.