दहा गुंतवणूकदारांसोबत लवकरच करार, स्थलांतरित मजुरांचीही नोंद ठेवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 04:04 AM2020-06-12T04:04:26+5:302020-06-12T04:04:57+5:30
स्थलांतरित मजुरांचीदेखील नोंद ठेवणार
मुंबई : येत्या दोन-तीन दिवसांत विविध देशांतील दहा औद्योगिक गुंतवणूकदारांसोबत करार केले जाणार आहेत. याशिवाय अमेरिका, युरोप, जपान, कोरिया, तैवान आदी देशांमधील गुंतवणूकदारांसोबतची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी येथे दिली.
रिब्युट इंडस्ट्रियल सेक्टर- पोस्ट कोविड या विषयावरील वेबिनारमध्ये ते बोलत होते. देसाई म्हणाले राज्यात आतापर्यंत सुमारे ६० हजार उद्योग सुरू झाले आहेत. त्यात १५ लाख कामगार रुजू झाले आहेत. काही उद्योगांना अद्याप मजुरांचा प्रश्न भेडसावत आहे. तो सोडवण्यासाठी औद्योगिक कामगार ब्यूरोची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यासाठी वेबपोर्टल तयार केले आहे. याद्वारे कुशल, अकुशल कामगारांची माहिती मिळणार आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात कामगार ब्यूरो सुरू होणार असल्याची माहिती उद्योगमंत्री देसाई यांनी दिली.
क्रांतिकारक पाऊल
च्स्थलांतरित मजुरांनी पुन्हा यावे. काही उद्योग त्यांची वाट पाहत आहेत. त्यांना सर्व सहकार्य केले जाईल. त्यांची नोंदणी केली जाईल. कोरोनाच्या संकटामुळे कुठल्या राज्यातून किती लोकं आले, याची नोंद ठेवली जाईल. नोंदणी हे
क्र ांतिकारक पाऊल ठरेल, असे देसाई यांनी सांगितले.