लवकरच यंत्रमाग कामगारांचे महामंडळ : हसन मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 01:47 PM2021-06-04T13:47:44+5:302021-06-04T13:50:41+5:30
Textile Industry Hasan Musrif Kolhapur : यंत्रमाग कामगारांचे महामंडळ स्थापन करण्याचा शासन लवकरच प्रयत्न करणार असून यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एका पत्रकाद्वारे दिले आहे.
कोल्हापूर : यंत्रमाग कामगारांचे महामंडळ स्थापन करण्याचा शासन लवकरच प्रयत्न करणार असून यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एका पत्रकाद्वारे दिले आहे.
महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहराचा वस्त्रनगरी म्हणून राज्यभर लौकिक आहे. इचलकरंजीसह सोलापूर, मालेगाव, भिवंडी आदी यंत्रमाग उद्योगांची संख्येने मोठय़ा असलेल्या शहरांमध्ये काम करत असलेल्या यंत्रमाग कामगारांच्या समस्यासाठी महामंडळ स्थापन करण्याचा अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.
यंत्रमाग कामगारांच्या समस्यासाठी भाजपच्या काळात जी समिती नेमली होती. त्या समितीचा अहवाल माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिलेला आहे. कामगार मंत्रीपदाची जबाबदारी माझ्याकडे येऊन अवघा एक महिना झालेला आहे. त्या समितीचा अहवाल पाहून यंत्रमाग धारकांचे महामंडळ करावं, अशी सातत्याने मागणी काँग्रेसचे नेते शशिकांत बावचकर व राष्ट्रवादीचे मदन कारंडे यांनी केलेली आहे.
यंत्रमाग कामगारांचे महामंडळ स्थापन करण्याचा शासन लवकरच प्रयत्न करील, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.