लवकरच आमचे सरकार स्थापन होणार; खासदार श्रीकांत शिंदे यांचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 09:12 PM2022-06-27T21:12:19+5:302022-06-27T21:12:50+5:30
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर खासदार असलेले श्रीकांत शिंदे कोणतीही प्रतिक्रिया देत नव्हते. परंतू कालपासून ते सक्रीय झाले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला दिलासा दिला आणि एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानासमोर फटाके वाजविण्यात आले. यानंतर शिंदे यांचे खासदार पूत्र श्रीकांत शिंदे यांनी लवकरच आमचे सरकार स्थापन होणार असल्याचे सांगितले.
ठाकरे सरकारला मविआतून बाहेर पडण्याचे शिंदे गटाने सांगितले आहे. असे केल्यास अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याची वेळ येणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. असे असताना उद्धव ठाकरे हे बंडानंतर दोनवेळा राजीनामा देण्याच्या तयारीत होते असेही वृत्त आले आहे. या साऱ्या घडामोडींवर श्रीकांत शिंदे यांचे वक्तव्य महत्वाचे आहे.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर खासदार असलेले श्रीकांत शिंदे कोणतीही प्रतिक्रिया देत नव्हते. परंतू कालपासून ते सक्रीय झाले आहेत. आज त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर यापुढेही असाच विजय होत राहणार आहे. लवकरच आमचे सरकार स्थापन होणार आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाच्या दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या अन्य काही आमदारांसह एकाएकी मुंबई सोडून गुजरातमधील सूरत येथे गेल्याची माहिती धडकली आणि राज्याच्या राजकारणात एक मोठा भूकंप झाला. गेल्या आठवड्याभरापासून एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाखोरीनंतर शिवसेनेसह महाविकास आघाडीत मोठी खळबळ उडाली. हळूहळू करत सुमारे ३८ ते ३९ आमदार शिंदे गटात सहभागी झाले. राज्यात यासंदर्भात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काही शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक झाले. तर काही आमदारांना त्यांच्या भागातून समर्थन मिळाले. मात्र, आता थेट गुवाहाटीतच एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनर लागल्याचे समोर आले आहे.