राज्यातीेल ज्वारी, तेलबियांच्या क्षेत्रात लांबलेल्या पावसामुळे होणार घट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 02:39 PM2020-01-04T14:39:35+5:302020-01-04T14:44:44+5:30

रब्बीचा पेरा ८० टक्क्यांवर : हरभऱ्याचे क्षेत्र वाढले

sorghum, oilseeds area decreased due to long time rain period | राज्यातीेल ज्वारी, तेलबियांच्या क्षेत्रात लांबलेल्या पावसामुळे होणार घट

राज्यातीेल ज्वारी, तेलबियांच्या क्षेत्रात लांबलेल्या पावसामुळे होणार घट

Next
ठळक मुद्देराज्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र ५६.९३ लाख हेक्टर राज्यात लांबलेल्या पावसामुळे रब्बीच्या पेरण्यांना उशिरा सुरुवातगाळप हंगामावरही लांबलेल्या पावसाचा विपरीत परिणाम परतीच्या पावसाचा तेलबियांना सर्वाधिक फटका

पुणे : लांबलेल्या पावसामुळे रब्बी ज्वारी व तेलबियांच्या क्षेत्रात मोठी घट होणार आहे. गव्हाच्या क्षेत्रात देखील काहीशी घट होईल. हरभऱ्याच्या क्षेत्रात मात्र सरासरीच्या दीडपट वाढ होण्याची शक्यता आहे. रब्बीची ४५ लाख ३१ हजार हेक्टरवरील (७९.५९ टक्के) पेरणीची कामे झाली असल्याची माहिती कृषी विभागाने प्रसिद्ध केली आहे. 
राज्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र ५६.९३ लाख हेक्टर आहे. राज्यात लांबलेल्या पावसामुळे रब्बीच्या पेरण्यांना उशिरा सुरुवात झाली. अगदी गाळप हंगामावरही लांबलेल्या पावसाचा विपरीत परिणाम झाला. त्यामुळे गाळप हंगाम एक महिना उशिरा सुरू झाला. रब्बी ज्वारीचे सरासरी क्षेत्र २६ लाख ७८ हजार ५१३ हेक्टर असून, १६ लाख ६६ हजार ७५६ (६२ टक्के) हेक्टरवर पेरा झाला आहे. गव्हाचे सरासरी क्षेत्र १० लाख १४ हजार ८०४ हेक्टर असून, ७ लाख ६३ हजार ९५१ हेक्टरवर (७५ टक्के) पेरणी झाली आहे. 
ज्वारीचे पीक पोटरी फुटण्याच्या अवस्थेत असून, गहू फुटण्याच्या स्थितीत आला आहे. मक्याची २ लाख २५ हजार २६० हेक्टरपैकी १ लाख ६० हजार ९५१ हेक्टरवरील (७१ टक्के) पेरणीची कामे झाली आहेत. ज्वारीसह या तीन पिकांचे क्षेत्रात यंदा सरासरीच्या तुलनेत काहीशी घट होईल. 
......
परतीच्या पावसाचा तेलबियांना सर्वाधिक फटका
हरभऱ्याच्या क्षेत्रात मात्र यंदा मोठी वाढ होईल. हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र १४ लाख ९० हजार २४७ हेक्टर असून, १८ लाख २ हजार ७१८ हेक्टरवर (१२१ टक्के) पेरा झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हरभºयाच्या क्षेत्रात दीडपट वाढ झाली आहे. 
.........
हरभरा पीक फांद्या फुटणे ते फुलोरा अवस्थेत आहे. करडई, जवस, तीळ, सुर्यफूल या तेलबियांचे सरासरी क्षेत्र १ लाख ६१ हजार ७९३ हेक्टर इतके आहे. आत्तापर्यंत अवघ्या ३४ हजार १६१ हेक्टरवर (२१ टक्के) पेरणी झाली आहे. 
.......
गेल्यावर्षी परतीच्या पावसाने ओढ दिल्याने तेलबियांना सर्वाधिक फटका बसला होता. गेल्यावर्षी या काळात तेलबियांचा अवघ्या १२ हजार हेक्टरवरच पेरा झाला होता. 

Web Title: sorghum, oilseeds area decreased due to long time rain period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.