पोटासाठी दु:ख गाठीला

By admin | Published: August 8, 2014 11:05 PM2014-08-08T23:05:00+5:302014-08-08T23:05:00+5:30

आख्खं गाव मातीखाली जाऊन दु:खाचा डोंगर कोसळला असताना माळीणकरांनी हे दु:ख गाठीला बांधून पोटासाठी भातशेती करण्याचा निर्णय घेतला आहे.

Sorrow for the stomach | पोटासाठी दु:ख गाठीला

पोटासाठी दु:ख गाठीला

Next
>घोडेगाव : आख्खं गाव मातीखाली जाऊन दु:खाचा डोंगर कोसळला असताना माळीणकरांनी हे दु:ख गाठीला बांधून पोटासाठी भातशेती करण्याचा निर्णय घेतला आहे. 
आता जर हे शेत केलं नाही तर 
वर्षभर विकतचा तांदूळ घ्यावा 
लागेल.   त्यामुळे शाश्वत संस्था व आदिवासी नागरिकांनी त्यांना पाठबळ दिले आहे. त्यांचे 7क् कार्यकर्ते भात आवणी करीत आहेत.  
माळीण गावातील लोकांचे उत्पन्नाचे मुख्य साधन भातशेती व हिरडा गोळा करणो. यातून मिळणा:या उत्पन्नावर कसेबसे वर्ष काढायचे. या वर्षी पाऊस उशिरा सुरू झाल्याने भातरोपे लवकर तयार झाली नाहीत. त्यात मुसळधार पावसामुळे माळीणमध्ये दुर्घटना घडली व पूर्ण गाव उद्ध्वस्त झाले. अनेक कुटुंबांतील एक ते दोन व्यक्ती मागे राहिल्या. बाकी सर्व लोक ढिगा:यात गाडले गेले. 
माळीणमधील लोकांनी भातशेती तयार करून ठेवली होती व पावसाची वाट पाहत होते. त्यात ही दुर्घटना घडली.
दुर्घटनेतून नशिबाने जगलेल्या लोकांना भात आवणी करून, मदत करण्याचा निर्णय शाश्वत संस्थेचे प्रमुख आनंद कपूर व कुसुमताई कर्णिक यांनी घेतला. 
29 कुटुंबांचे भातलागवड करण्याचे काम हाती घेतले आहे. 6 ऑगस्टपासून 18 गावांमधील 42 कार्यकर्ते, तसेच 16 मच्छीमार कातकरी एकत्र आले.  देवराम असवले व हनुमंत बांबळे यांनी औताची मदत केली. 
विठ्ठल असवले, त्यांची पत्नी बबिता व मुलगी पूजा यांनी या सर्व कार्यकत्र्याची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली. या कामामध्ये कार्यकत्र्याची वाढ होत असून, सुमारे 7क् कार्यकर्ते भात लागवडीच्या कामाला लागले आहेत. 
(वार्ताहर)
 
4माळीण दुर्घटनाग्रस्त आदिवासी बांधवांना मदत करण्यासाठी खारीचा वाटा म्हणून हे काम हाती घेतले असून, पुढील काळात लागेल ती मदत आम्ही करू, अशी भावना बुधाजी डामसे, नामदेव भांगरे, मीराबाई दांगट, काळू कुडळ, बबन मावळे, स्मिता साळवे व आदिवासी शेतक:यांनी व्यक्त केली. 
 
4पहिल्या दिवशी दुंदा लेंभे, सखाराम झांजरे, लुमा लेंभे 
यांची भात आवणी या कार्यकत्र्यानी केली.
4त्यानंतर दि. 7 ऑगस्ट रोजी समीर लेंभे, धमर्ेेंद्र झांजरे, मंगलदास दांगट यांची भात आवणी केली.
4दोन दिवसांत सुमारे 2 एकर 
व 5 गुंठे क्षेत्रत भात आवणी 
केली गेली.
 

Web Title: Sorrow for the stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.