Bhagat Singh Koshyari: त्या विधानाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मागितली माफी, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 07:19 PM2022-08-01T19:19:08+5:302022-08-01T19:29:47+5:30

Bhagat Singh Koshyari: महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करून आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या माफी मागताना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Sorry for that statement, Governor Bhagat Singh Koshyari apologized, saying... | Bhagat Singh Koshyari: त्या विधानाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मागितली माफी, म्हणाले...

Bhagat Singh Koshyari: त्या विधानाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मागितली माफी, म्हणाले...

googlenewsNext

मुंबई - राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या एका विधानामुळे मोठा गदारोळ उठला होता. मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक गेले तर मुंबईत पैसा राहणार नाही, असे राज्यपाल म्हणाले होते. राज्यपालांच्या या विधानावर चौफेर टीका झाली होती. दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज एक पत्रक प्रसिद्ध करत माफी मागितली आहे. महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करून आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या माफी मागताना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

याबाबत प्रसिद्ध केलेल्या निवेदनात राज्यपाल म्हणाले की, दिनांक २९ जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडून कदाचित काही चूक झाली. महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे.  विशेषतः संबंधित राज्याची सर्वसमावेशकता व सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्ज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगती पथावर अग्रेसर होत आहे. गेल्या जवळपास तीन वर्षांत मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे. आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला.

 

परंतु,  त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही. महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करून आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो, असे भगतसिंह कोश्यारी म्हणाले. 

Web Title: Sorry for that statement, Governor Bhagat Singh Koshyari apologized, saying...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.