कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात--राष्ट्रवादी ठरवून ‘गायब’ :

By Admin | Published: October 2, 2014 12:31 AM2014-10-02T00:31:38+5:302014-10-02T00:38:33+5:30

शिवसेनेचा सवतासुभा निर्णायक मतदारांची कसोटी बघणारी लढत

In the South constituency of Kolhapur - Desperate as 'Nationalist': | कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात--राष्ट्रवादी ठरवून ‘गायब’ :

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात--राष्ट्रवादी ठरवून ‘गायब’ :

googlenewsNext

 विश्वास पाटील- कोल्हापूर कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात अर्ज माघारीनंतर तिरंगी लढतीचे चित्र पुढे आले आहे. काँग्रेसकडून माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, भाजपकडून अमल महाडिक, शिवसेनेकडून विजय देवणे हे प्रमुख उमेदवार रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्वास कदम यांनी माघार घेतल्याने त्या पक्षाचे चिन्हच दिसणार नाही. गेल्या निवडणुकीत ‘सतेज पाटील विरुद्ध महाडिक गट’ अशी लढत झाली होती. या वेळेला त्या लढतीत शिवसेनेची एंट्री झाली आहे. या पक्षाने जिल्हाप्रमुख विजय देवणे या तगड्या उमेदवारास संधी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेचा हा सवतासुभाच या लढतीचा निकाल ठरविणार आहे. आमदार महादेवराव महाडिक यांनी प्रत्येकवेळेला नवा राजकीय घरोबा केला आहे. पूर्वीच्या आपल्याच भूमिकेच्या बरोबर उलटे ते वागत आले आहेत. तसे करणे यात त्यांना काहीच गैर वाटत नाही. लोकांना आपण काहीही वागलो तरी चालते, असे गृहीत धरून त्यांचे राजकारण सुरू आहे. त्याला लोक मान्यता देतात की, या दलबदलूपणास नाकारतात, हा देखील या लढतीतला कळीचा मुद्दा असेल. त्यामुळे या लढतीत लोकांचीही कसोटी लागणार आहे. मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर या मतदारसंघात दुसरी निवडणूक होत आहे. तसा काँग्रेसचेच वर्चस्व असलेला हा मतदारसंघ. भाजपकडे जुना करवीर व नंतर हा मतदारसंघ आला. त्या पक्षाला मानणारी काही निश्चित मते आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपच्या सूर्यकांत पाटील-बुदिहाळकर यांना कशीबशी अकरा हजार मते मिळाली. कारण सतेज पाटील यांच्याविरोधातील सर्व नाराज, छुपे गट धनंजय महाडिक यांच्याबाजूने उभे राहिले. अत्यंत अटीतटीची लढत होऊन त्यात सतेज पाटील यांनी ५,७६७ मतांनी बाजी मारली. या वेळेलाही सतेज पाटील यांच्याविरोधात सगळ्या नाराजांची मोट बांधण्याचा आमदार महादेवराव महाडिक यांचा प्रयत्न होता. परंतु, उमेदवारांची संख्या वाढली. हीच गोष्ट सतेज पाटील यांच्या पथ्यावर पडणारी आहे. शिवसेना-भाजप व स्वाभिमानीची एकत्रित मूठ व त्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी लाटेची हवा मिळाली असती तर वेगळे चित्र तयार झाले असते. परंतु, आज तसे घडलेले नाही. कारण त्यातून शिवसेना बाजूला गेली आहे. दोन्ही काँग्रेस बाजूला झाल्या असल्या तरी राष्ट्रवादीचे नगरसेवक सतेज पाटील यांच्यासमवेत आहेत. ग्रामीण भागातील राष्ट्रवादी सोयीनुसार काँग्रेससोबत व बहुतांश अमल महाडिक यांनाच मदत करेल, तसे करता यावे म्हणूनच अधिकृत उमेदवारास माघार घेणे भाग पडले आहे. महाडिक गटाचे या मतदारसंघात फारसे विकासात्मक काम नाही. परंतु, गट म्हणून ‘साम, दाम, दंड, भेद, नीती’ वापरून निवडणुका जिंकण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. खासदार धनंजय महाडिक आपल्यासमोर धर्मसंकट असल्याचे जाहीरपणे सांगत असले तरी ते छुप्यारितीने व इतर सर्व कुटुंबीय उघडपणे अमल महाडिक यांच्या प्रचारात उतरले आहेत. हे असेच होणार असे गृहीत धरून सतेज पाटील मैदानात उतरले आहेत. ‘रस्त्यावरील कार्यकर्ता’ अशी देवणे यांची मतदारसंघात ओळख आहे. शिवसेनेला मानणारा कमीजास्त का असेना; परंतु प्रत्येक गावात मतदार आहे व हेच त्यांचे बळ आहे. त्याआधारे देवणे किती धडक देतात, हे महत्त्वाचे असेल. कोल्हापूर दक्षिण एकूण मतदार ३,0७,६४९ नावपक्ष सतेज पाटीलकाँग्रेस अमल महाडिकभाजप विजय देवणे शिवसेना राजू दिंडोर्लेमनसे रवींद्र कांबळे बसपा अशोक महाडिक बहुजन विकास आघाडी मारुती मिरजकर हिंदू महासभा संदीप संकपाळ महाराष्ट्र वि. आघाडी सखाराम कांबळेअपक्ष गोपाळ कांबळेअपक्ष जीवन पाटीलअपक्ष मोहन सालपे अपक्ष

Web Title: In the South constituency of Kolhapur - Desperate as 'Nationalist':

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.