दक्षिण कोरियन के -पॉपची युवकांमध्ये झिंग

By admin | Published: June 28, 2016 10:20 PM2016-06-28T22:20:03+5:302016-06-28T22:20:03+5:30

दक्षिण कोरियाचा के-पॉप हा प्रकार जगभर प्रसिद्ध होत आहे. दक्षिण कोरियाची प्राचीन संगीतकला सर्वदूर पसरावी आणि अन्य देशांतील टॅलेण्ट नव्या कला यांचा मेळ व्हावा

South Korean K-pop youth wrestling | दक्षिण कोरियन के -पॉपची युवकांमध्ये झिंग

दक्षिण कोरियन के -पॉपची युवकांमध्ये झिंग

Next

- पूजा दामले 

मुंबई :  दक्षिण कोरियाचा के-पॉप हा प्रकार जगभर प्रसिद्ध होत आहे. दक्षिण कोरियाची प्राचीन संगीतकला सर्वदूर पसरावी आणि अन्य देशांतील टॅलेण्ट नव्या कला यांचा मेळ व्हावा, या उद्देशाने के-पॉप स्पर्धेचे आयोजन केले जाते. भारतात दिल्ली, सिक्कीम, मुंबई, कोलकाता, बंगळुरु आणि चेन्नई या ठिकाणी या स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्या होणार आहेत. २ जुलै रोजी मुंबईत या स्पर्धेची प्राथमिक फेरी जयहिंद महाविद्यालयात पार पडणार आहे. या स्पर्धेत संगीत आणि नृत्य या दोन कलांची स्पर्धा रंगते. या स्पर्धेचा फिवर आत्तापासून युवकांमध्ये चढण्यास सुरुवात झाली आहे.
अनेक शतकांपासून दक्षिण कोरियात संगीत-नृत्याची कला जोपासली जात आहे. आनंद व्यक्त करण्यासाठी संगीताचा आधार घेतला जातो. कोरियातील हिपहॉप संगीताचा जगभर नावलौकीक आहे. कोरियातील शाळांमध्ये रोजच्या अभ्यासातही संगीत कलेचा समावेश असतो. हे संगीत फक्त तरुणाईलाच नाही तर, तिशी, चाळीशीच्या व्यक्तींच्याही पसंतीला उतरते. इंडोनेशिया, थायलंड, इजिप्त येथे झालेल्या स्पर्धेतूनही हे दिसून आले आहे. या स्पर्धेला येणारे प्रेक्षक बहुतांशी तिशी-चाळिशीतले असतात. यांच्याकडून स्पर्धकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. भारतातही हिपहॉपची क्रेझ सध्या निर्माण होत आहे. गंगम स्टाईल सध्या आपल्याकडे कमालीची लोकप्रिय ठरत आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा भारत आणि दक्षिण कोरियाचे संबंध सुदृढ होणार असल्याचे दक्षिण कोरियाचे कौन्सिल जनरल साँग युन कीम यांनी लोकमतला सांगितले.
२ हजार वर्षांपूर्वी भारतातील राजकन्या कोरियात आली होती. तर त्यानंतर काही वर्षांनी कोरियातील प्रिस्ट तिबेट मार्गे भारतात आले. या मार्गे त्यांनी बुद्धिझम भारतातून कोरियात नेला. दक्षिण कोरियात ऋतुमानानुसार फिरण्यासाठी वेगवेगळी ठिकाणे आहेत. कोरियात आयलंड आणि पहाड देखील समृद्ध आहेत. भारतातून आलेल्या राजकन्येने कोरियात जेथे वास्तव्य केले, ते ठिकाण देखील कोरियातील महत्त्वाचे प्रेक्षणीय स्थळ आहे.

दक्षिण कोरिया-मुंबई विद्यापीठात करार
भारतातून दक्षिण कोरियात जास्त विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत नाहीत. पण, दक्षिण कोरियातील १० विद्यार्थी मुंबई विद्यापीठात, २५ विद्यार्थी पुणे विद्यापीठात आणि सिम्बॉयसिसमध्ये १० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पण, पुढच्या काळात विद्यार्थ्यांसाठी सामंजस्य करार करण्यात येणार आहे. कोरियाच्या योन्से विद्यापीठाने मुंबई विद्यापीठाशी एक करार केला आहे. नजिकच्या काळात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख कोरियात जावून एका सामंजस्य करारावर सही करणार आहेत. त्यानंतर दोन्ही देशांत स्टुडण्ट एक्सेंज प्रोग्रामह्ण सुरु होणार असल्याचे कौन्सिल जनरल साँग युन कीम यांनी लोकमतला सांगितले.

Web Title: South Korean K-pop youth wrestling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.