‘साऊथ नवी मुंबई’ ठरणार देशातील पहिली स्मार्ट सिटी - मुख्यमंत्र्यांची घोषणा

By Admin | Published: December 5, 2015 09:09 AM2015-12-05T09:09:29+5:302015-12-05T09:09:29+5:30

देशातील पहिली स्मार्ट सिटी होण्याचा बहुमान सिडको उभारत असलेल्या साऊथ नवी मुंबईला मिळणार आहे. या परिसरात ५३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होत असून तब्बल ९ लाख

'South Navi Mumbai' will be the first Smart City in the country - Chief Minister Announcement | ‘साऊथ नवी मुंबई’ ठरणार देशातील पहिली स्मार्ट सिटी - मुख्यमंत्र्यांची घोषणा

‘साऊथ नवी मुंबई’ ठरणार देशातील पहिली स्मार्ट सिटी - मुख्यमंत्र्यांची घोषणा

googlenewsNext

नवी मुंबई : देशातील पहिली स्मार्ट सिटी होण्याचा बहुमान सिडको उभारत असलेल्या साऊथ नवी मुंबईला मिळणार आहे. या परिसरात ५३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होत असून तब्बल ९ लाख रोजगारनिर्मिती होणार आहे. सामान्य नागरिकांसाठी ५५ हजार घरे बांधली जाणार असून स्मार्ट सिटी कशी असते याचे आदर्श मॉडेल या परिसरात उभे राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
देशातील पहिली स्मार्ट सिटी- साऊथ नवी मुंबईच्या उभारणीस शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. पंतप्रधानांच्या संकल्पनेतील पहिली स्मार्ट सिटी महाराष्ट्रात उभी राहात आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे ते म्हणाले. सिडकोने शासनाचा कोणताही निधी न घेता या परिसराचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. जमिनीची सर्व माहिती संकेतस्थळावर देऊन व माहिती अधिकारासाठीही आॅनलाइन सुविधा देऊन या संस्थेने खऱ्या अर्थाने सेवा हमी योजनेची अंमलबजावणी केली आहे. याच धर्तीवर राज्यातील सर्व २८५ सुविधा आॅनलाइन करण्याचा सरकारचा मानस आहे. अतिक्रमण रोखण्यासाठी सॅटेलाइट मॅपचा वापर, मेट्रो, मोनो, विमानतळ, शहरात सर्वत्र सीसीटीव्हीचे जाळे उभारण्यात येत आहे. स्मार्ट शहर कसे असावे याचे आदर्श मॉडेल म्हणून साऊथ नवी मुंबई ओळखली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. स्मार्ट सिटी उभारताना प्रकल्पग्रस्तांचा विसर पडू दिला जाणार नाही. सिडकोने अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यांनी आता राज्यातील इतर शहरे स्मार्ट होण्यासाठी कमी व्याजदराने अर्थपुरवठा सुरू करावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. सामान्य नागरिकांसाठी ५५ हजार घरे बांधली जाणार आहेत. सर्वाधिक खर्च परवडणारी घरे बांधण्यासाठी होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. स्मार्ट सिटीची उभारणी करताना या परिसरात ९ लाख रोजगारनिर्मिती होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ठाणे जिल्ह्णाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही स्मार्ट सिटी उभारताना प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे सांगितले. सिडकोेचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी स्मार्ट सिटीमध्ये प्रकल्पांविषयी माहिती दिली. यावेळी आमदार मंदा म्हात्रे, संदीप नाईक, प्रशांत ठाकूर, महापौर सुधाकर सोनावणे, व्ही. राधा, अश्विनी जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते.

शहराबरोबर गावांचाही विकास हवा
गावांच्या विकासावरही लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्राचा वापर करून उत्पादकता वाढविण्यावर भर दिला जाईल. नागपूर-मुंबई सुपर एक्स्प्रेसचे काम हाती घेण्यात येणार
आहे. ८ तासांत या दोन शहरांमध्ये पोहचता येईल. याचा लाभ शेती आणि
उद्योगांना होईल.

इको सेन्सेटिव्ह झोनवर सॅटेलाइटची नजर
राज्यातील सर्व इको सेन्सेटिव्ह झोनवर सॅटेलाइटद्वारे नजर ठेवली जाणार आहे. प्रत्येक महिन्याला सॅटेलाइटद्वारे मिळालेल्या नकाशामध्ये कुठे अतिक्रमण झाले, तिवरांची कत्तल झाली तर तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे.

स्मार्ट सिटीची वैशिष्ट्ये
प्रकल्पखर्च
जेएनपीटी विस्तारीकरण८००० कोटी
परवडणारी ५५ हजार घरे१०७०० कोटी
नैना प्रोजेक्ट४००० कोटी
राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण३०००
रेल्वे व मेट्रो प्रोजेक्ट१३०६० कोटी
पायाभूत सुविधा७४८४.२६कोटी

४१८ कोटी पर्यावरण रक्षणासाठी

विशेष प्रकल्प६३५ कोटी
पाणी योजनांसाठी७४८४. २६ कोटी

Web Title: 'South Navi Mumbai' will be the first Smart City in the country - Chief Minister Announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.