केवळ 2 टक्केच पेरण्या

By admin | Published: June 24, 2014 12:55 AM2014-06-24T00:55:13+5:302014-06-24T00:55:13+5:30

राज्याच्या बहुतेक भागात पावसाने दडी मारलेली आहे. जूनचा चवथा आठवडाअखेर केवळ 2 टक्केच पेरण्या झाल्या आहेत.

Sow only 2 percent | केवळ 2 टक्केच पेरण्या

केवळ 2 टक्केच पेरण्या

Next
>मुंबई : राज्याच्या बहुतेक भागात पावसाने दडी मारलेली आहे. जूनचा चवथा आठवडाअखेर केवळ 2 टक्केच पेरण्या झाल्या आहेत. गेल्यावर्षी आजच्या तारखेला राज्यातील 7क् ते 8क् टक्के पेरण्या आटोपल्या होत्या. गेल्या तीन वर्षात नैसर्गिक आपत्तीत 12 हजार कोटी रुपये राज्य शासनाने खर्च केले होते. आता पुन्हा राज्यात दुष्काळी चित्र निर्माण होते की काय, अशी परिस्थिती असल्याने प्रशासन धास्तावले आहे. 
दुसरीकडे राज्यात टँकरने पाणीपुरवठा होण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. 1 हजार 464 गावे, 3 हजार 687 वाडय़ांवर 1 हजार 454 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. 
धरणांमधील पाणीसाठाही कमीकमी होत आहे. राज्यातील धरणांमध्ये आता सरासरी 2क् टक्के पाणी शिल्लक आहे. त्यात मोठय़ा, मध्यम आणि लघु प्रकल्पांचा समावेश आहे.  मोठय़ा धरणांचा विचार करता कोकणात 34 टक्के, मराठवाडय़ात 2क् टक्के, नागपूर विभागत 46 तर अमरावती विभागात 36 टक्के, नाशिक 14 टक्के, पुणो 13 टक्के  असा जलसाठा शिल्लक आहे. (प्रतिनिधी)
 
च्राज्य शासनाने ऑगस्ट 2क्12 ते 2क्13 या वर्षात दुष्काळ निवारणावर 5 हजार 5क्क् कोटी रुपये खर्च केले. त्यानंतर गारपीटग्रस्तांना मदतीसाठी 35क्क् कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्यानंतरच्या 3 हजार कोटी रुपये अतिवृष्टीग्रस्तांना मदतीदाखल खर्च झाले. त्यात केंद्र सरकारने 3 हजार 5क्क् कोटी रुपयांची मदत राज्याला दिली, असे मदत व पुनर्वसन सचिव मिलिंद म्हैसकर म्हणाले.
 
च्मान्सूनच्या विलंबामुळे पाऊसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. राज्यात 2 टक्केच पेरणी झाली आहे. कोकण,पूर्व विदर्भात काही ठिकाणी पाऊस सुरू झाला आहे. तेथे मुख्य पीक असलेल्या भाताची रोपे तयार करण्याचे काम त्यामुळे सुरू झाले तरी लागवण झाली नाही. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याच्या काही भागात पाऊस पडला पण इतर भागात निराशाजनक चित्र असल्याचे राज्याचे कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी सांगितले.

Web Title: Sow only 2 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.