पेरणी करताना शेतक-याचा हदयविकाराने मृत्यू
By admin | Published: July 7, 2016 07:58 PM2016-07-07T19:58:26+5:302016-07-07T19:58:26+5:30
शेतामध्ये पेरणी करीत असतानाच नांदुरा तालुक्यातील वडनेर येथील शेतकरी वसंत शामजी सातव (वय ६५) यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला
Next
>ऑनलाइन लोकमत
खामगाव, दि. ७ : शेतामध्ये पेरणी करीत असतानाच नांदुरा तालुक्यातील वडनेर येथील शेतकरी वसंत शामजी सातव (वय ६५) यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी येथील शेतशिवारात घडली. वडनेर परिसरात दोन दिवसांपुर्वी पावसाने दमदार हजेरी लावल्याने सर्वत्र पेरणीची कामे सुरू आहेत. वसंत सातव हे देखील गुरुवारी आपल्या वडनेर शिवारातील शेतात स्वत: पेरणी करीत असताना दुपारी २ वाजेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व जागेवरच कोसळले. त्यांना उपचारार्थ मलकापूर येथील खाजगी रूग्णालयात नेले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. एका शेतकºयावर अशाप्रकारे काळाने घाला घातल्यामुळे वडनेरसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत शेतकºयाच्या पश्चात पत्नी, २ मुले, सुना, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे. बुलडाणा नायब तहसिलदार पी.एस. सातव व रिटायर्ड सपोनि सुहास सातव हे दोघे वसंता सातव यांचे मोठे बंधु आहेत.