पावसाअभावी केवळ सव्वा टक्के क्षेत्रावर पेरण्या !
By Admin | Published: June 18, 2015 02:34 AM2015-06-18T02:34:49+5:302015-06-18T02:34:49+5:30
मान्सूनचे आगमन होऊन आठवडा उलटला तरी राज्यात १६ जूनअखेर सरासरीच्या खूपच कमी पाऊस झाल्याने केवळ सव्वा टक्के क्षेत्रावरच
पुणे : मान्सूनचे आगमन होऊन आठवडा उलटला तरी राज्यात १६ जूनअखेर सरासरीच्या खूपच कमी पाऊस झाल्याने केवळ सव्वा टक्के क्षेत्रावरच खरीप पिकांच्या पेरण्या झाल्याची माहिती कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी येथे दिली.
कृषी विभागाने वेगवेगळ््या टप्प्यांत अपेक्षित पावसाअभावी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा आपत्कालीन आराखडा तयार केला आहे. जमिनीत पुरेसा ओलावा आल्याशिवाय शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या करण्याची घाई करू नये, असे आवाहन त्यांनी केले. राज्यात खरिपाचे सुमारे १३५ लाख हेक्टर क्षेत्र असून, आतापर्यंत केवळ सव्वा टक्के म्हणजे १ लाख ५३ हजार हेक्टर क्षेत्रांवरच पेरण्या झाल्या आहेत. कृषी विभागाने खरीप हंगामाची पूर्ण तयारी केली आहे. चालू हंगामासाठी १६.६४ लाख क्विंटल बियाण्सांची आवश्यकता असताना १७.५० लाख क्विंटल बियाण्याचा पुरावठा केलेला आहे. तसेच खताचा २१ टक्के अधिक साठा उपलब्ध आहे. राज्यात खरीप पिकांमध्ये कापूस आणि सोयाबीनचे क्षेत्र मोठे असून, त्यासाठीही बियाण्यांचा पुरवठा उपलब्ध करून दिला आहे, असे देशमुख म्हणाले.
अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे कृषी विभागाने पाऊस १५ दिवस लांबणीवर
पडल्यास किंवा ३० तसेच ४५
दिवस उशिरा आल्यास कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा आराखडा तयार केल्याचे देशमुख
म्हणाले. (प्रतिनिधी)