साडेतीन हजार हेक्टरवर पेरणी
By Admin | Published: June 13, 2016 11:27 PM2016-06-13T23:27:13+5:302016-06-13T23:29:53+5:30
शिरूर अनंतपाळ/किल्लारी : तालुक्यात मान्सूनपूर्व दमदार पाऊस झाल्याने दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या.
शिरूर अनंतपाळ/किल्लारी : तालुक्यात मान्सूनपूर्व दमदार पाऊस झाल्याने दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी चाड्यावर मूठ धरण्यास सुरुवात केली. दरम्यान, मृग नक्षत्राचा पाऊस न झाल्याने काही शेतकऱ्यांनी पेरणी थांबविली आहे. तालुक्यात आतापर्यंत साडेतीन हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.
तालुक्यातील सिंचन क्षेत्र मोठ्या प्रमाणात मोडीत निघाल्याने २८ हजार ५०० हेक्टरवर खरीपाची पेरणी होणे अपेक्षित आहे. त्यात २० हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होईल, असा सर्वे तालुका कृषी कार्यालयाकडून करण्यात आला आहे. मृग नक्षत्राच्या सुरुवातीस व मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे बाजारपेठेत शेतकऱ्यांची बी-बियाणे, खते खरेदी करण्यासाठी रेलचेल आहे.