अठरा लाख हेक्टरवरील सोयाबीन धोक्यात

By admin | Published: September 5, 2014 01:25 AM2014-09-05T01:25:23+5:302014-09-05T01:47:05+5:30

पीक पिवळे पडले : विदर्भातील शेतकर्‍यांपुढे नवे संकट

Soyabean danger to 18 million hectares | अठरा लाख हेक्टरवरील सोयाबीन धोक्यात

अठरा लाख हेक्टरवरील सोयाबीन धोक्यात

Next

अकोला : पुरेशा पावसाअभावी पेरणीला अगोदरच विंलब झाला असताना, आता उगवलेली सोयाबीनची झाडे पिवळी पडल्याने विदर्भातील लाखो हे क्टरवरील पीक धोक्यात आले आहे. काही ठिकाणी पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आधीच दुबार, तिबार पेरणी करू न आर्थिक अजचणीत सा पडलेल्या शेतकर्‍यांपुढे नवे संकट उभे ठाकले आहे.
पश्‍चिम विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्हय़ातील बहुतांश भागात सुमारे १७ लाख हेक्टर सोयाबीन पिवळे पडले आहे. मुळकुज व पिवळा मोझैक या रोगांचा प्रादूर्भाव झाल्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहे.
शेकडो शेतकर्‍यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे झाडांचे प्रातिनिधीक नमुने पाठविले आहेत. सद्यस्थितीत जमिनीत कमी ओलावा असल्यामुळे झाडांच्या मुळांना श्‍वासोच्छवास घेण्यात अडथळा येतो. त्यामुळे झाडांना जमिनीतील पोषण द्रव्य शोषून घेता येत नसल्याने पाने पिवळी पड त असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
सततच्या ढगाळ वातावरणामुळे झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही. वातावरणातील बदलानंतर मात्र ही विपरित परिस्थिती बदलण्यास मदत होईल, असे प्रादेशिक सोयाबीन संशोधन केंद्र, अमरावतीचे प्रमुख डॉ. सी. यु. पाटील यांनी सांगीतले.

Web Title: Soyabean danger to 18 million hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.