पश्चिम वर्हाडातील सोयाबीन धोक्यात
By Admin | Published: August 30, 2014 12:04 AM2014-08-30T00:04:04+5:302014-08-30T00:06:32+5:30
पश्चिम वर्हाडातील सोयाबीन पीकावर ‘स्पोडोप्टेरा लिट्यूरा’ किडीचे आक्रमण झाल्याने पीक धोक्यात
ब्रम्हानंद जाधव
मेहकर : पावसाने दगा दिल्यानंतर आता पश्चिम वर्हाडातील सोयाबीन पिकावर ह्यस्पोडोप्टेरा लिट्यूराह्ण नामक किडीचे भयावह आक्रमण झाल्याने, हे पीक धोक्यात सापडले असून, शेतकर्यांसाठी हा मोठाच आघात आहे. अनेक वर्षे कपाशी हे पश्चिम वर्हाडातील प्रमुख पीक होते; मात्र गत काही वर्षांपासून सोयाबीनने कपाशीचे ते स्थान हिरावून घेतले असून, यावर्षी सुमारे ८ लाख ३७ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली आहे, हे येथे उल्लेखनीय आहे.
अकोला, बुलडाणा आणि वाशिम या पश्चिम वर्हाडातील तीन जिल्ह्यात, दरवर्षी साधारणत: १५ ते २0 जूनदरम्यान पेरणीला सुरूवात होत असत; मात्र यंदा पावसाला उशिरा प्रारंभ झाल्याने खरिपाच्या पेरण्याही लांबल्या. परिणामी मूग व उडिद या कमी कालावधीच्या पिकांचा पेरा तर जवळपास झालाच नाही. त्यामुळे सोयाबीनकडे शेतकर्यांचा कल वाढला; पण अपुर्या पावसामुळे मध्यंतरी सोयाबीनही करपण्याच्या मार्गावर होते. पोळ्यापासून समाधानकारक पाऊस झाल्याने सोयाबीनला तारले; मात्र, भाद्रपद महिन्यास प्रारंभ झाला आणि कर्दनकाळ समजल्या जाणार्या ह्यस्पोडोप्टेरा लिट्यूराह्णया भयावह किडीचे सोयाबीन पिकावर आक्रमण झाले. त्यामुळे सोयाबीन पीक पुन्हा एकदा धोक्यात सापडले आहे.
सोयाबीनवर ह्यस्पोडोप्टेरा लिट्यूराह्ण या किडीचे आक्रमण झाल्याने शेतकरी चिंतातूर झाला असला तरी, शेतकर्यांनी घाबरून न जाता, कृषि विभागाच्या सल्ल्यानुसार उपाययोजना करावी, असे तालुका कृषि अधिकारी मधुकर काळे यांनी सांगीतले.
*ह्यस्पोडोप्टेरा लिट्यूराह्णचे लक्षणे व परिणाम
भाद्रपद महिन्याच्या सुरूवातीला ह्यस्पोडोप्टेरा लिट्यूराह्णची अंडी क्रियाशील होतात. आठवडाभरात अंड्यातून अळी बाहेर पडते. ही अळी मोठय़ा प्रमाणात सोयाबीनची पाने कुरतडते. त्यामुळे अन्न निर्माण प्रक्रियेतील प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते आणि सोयाबीनची फुल व शेंग भरणीची प्रक्रिया विस्कळीत होऊन, उत्पादन बाधित होते.
*अशी करा उपाययोजना !
ह्यस्पोडोप्टेरा लिट्यूराह्णच्या नियंत्रणासाठी, ५0 मिलिलीटर क्विनॉलफॉस व ५0 मिलिलीटर निंबोळी अर्क १0 लीटर पाण्यात मिसळून पॉवर स्प्रे पंपच्या साहाय्याने फवारणी करावी. किंवा प्रोफेनोफॉस + सायपरमेथ्रीन या संयुक्त किटकनाशकाची ४0 मिलिलीटर मात्रा १0 लीटर पाण्यात मिसळून पॉवर स्प्रे पंपच्या साहाय्याने फवारणी करावी.