सोयाबीन दराचा आलेख घसरताच
By Admin | Published: October 31, 2016 04:35 AM2016-10-31T04:35:25+5:302016-10-31T04:35:25+5:30
३,५०० रुपये प्रतिक्विंटल असलेले सोयाबीनचे दर अचानक २ हजार रुपये प्रति -क्विंटलपर्यंत खाली आल्याने ऐन दिवाळीत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे दिवाळे
अकोला : ३,५०० रुपये प्रतिक्विंटल असलेले सोयाबीनचे दर अचानक २ हजार रुपये प्रति -क्विंटलपर्यंत खाली आल्याने ऐन दिवाळीत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे दिवाळे काढल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
सोयाबीन काढणीचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे. सरासरी दर २,६०० रुपये असला तरी प्रतवारीच्या नावाखाली शेतकऱ्यांना कमीत कमी दर दिला जातो, असा शेतकऱ्यांचा आजपर्यंतचा अनुभव आहे. यावर्षी तर पावसाने सोयाबीन पिकाची नासाडीच केली आहे. त्यातच आता काढणी हंगामात सोयाबीनचे दर कोसळले आहेत.
यावर्षी सुरुवातीला सतत पाऊस सुरू होता. परिणामी, शेतकऱ्यांना या पिकातील तण काढता आले नाही. या बेसुमार वाढलेल्या तणातून सोयाबीन काढणीसाठी मजूर शिरायला तयार नसल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना हार्वेस्टर लावावा लागत आहे. हार्वेस्टरने काढलेल्या सोयाबीचा रंग हिरवा, ताबंडा होतो. त्यामुळे प्रतवारीचे निकष लावून शेतकऱ्यांना १,८०० रुपये ते २ हजार रुपये प्रतिक्ंिवटल दर दिले जात आहेत. उत्पादन खर्चही मिळत नसल्याने शेतकरी कमालीचा नाराज झाला आहे. (प्रतिनिधी)
>ज्वारीही पडली काळी
कापूस, सोयाबिननंतर विदर्भातील दुसरे मुख्य पीक असलेल्या ज्वारीलाही समाधानकारक दर मिळत नाही. परतीच्या पावसाने कहर केल्याने काढणीला आलेली ज्वारी काळी पडली आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी ज्वारीला सरासरी १,३५० रुपये प्रतिक्ंिवटल दर होते. येथेही प्रतवारीचे निकष लागत असल्याने हे दर १,१०० च्या खाली उतरले आहेत.
>इतरही धान्याचे
भावही दर घसरले!
(सरासरी प्रतिक्विंटल दरपत्रक)
गहू १,८१० रुपये
उडिद ६,६०० ते ७,५०० रुपये
मूग ४,५७५ रुपये
तूर ६,५०० रुपये
हरभरा ८,४५० रुपये