राज्यपाल अन् सरकारमध्ये संघर्षाची ठिणगी

By admin | Published: September 4, 2014 02:20 AM2014-09-04T02:20:32+5:302014-09-04T02:20:32+5:30

नवे राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि आघाडी सरकारमध्ये संघर्षाची पहिली ठिणगी पडल्याचे चित्र बुधवारी समोर आले.

The spark of confrontation between the governor and the government | राज्यपाल अन् सरकारमध्ये संघर्षाची ठिणगी

राज्यपाल अन् सरकारमध्ये संघर्षाची ठिणगी

Next
मुंबई : नवे राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि आघाडी सरकारमध्ये संघर्षाची पहिली ठिणगी पडल्याचे चित्र बुधवारी समोर आले. गृहमंत्री वा गृहराज्य मंत्र्यांच्या परस्पर राज्यपाल थेट पोलीस महासंचालक आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडून कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेत असल्याबद्दल गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. 
गृहमंत्र्यांना बोलावून राज्यपालांनी आढावा घेतला तर समजू शकतो, पण थेट अधिका:यांना ते कसे बोलावू शकतात, असा सवाल गृहमंत्री पाटील यांनी केला आहे. राज्यपाल तेलंगणाचे असून आंध्र प्रदेशशी महाराष्ट्राचा पाण्यावरून वाद सुरू असताना विद्यासागर राव यांना केंद्र सरकारने राज्यपाल म्हणून कसे पाठविले, असा सवालही पाटील यांनी केला. जयंत पाटील यांनी आर. आर. यांची बाजू उचलून धरली.  पण राज्यपालांवरून जास्त चर्चा करू नये, असे मत व्यक्त करीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चर्चेवर पडदा टाकला.
राज्याचे माजी मुख्य सचिव जे.एस.सहारिया यांची राज्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल राव यांच्याकडे पाठविला होता. मात्र, या प्रस्तावाला राज्य मंत्रिपरिषदेची मान्यता नाही, असे कारण देत त्यांनी तो परत पाठविला. त्यामुळे आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहारिया यांच्या नावाची शिफारस राज्यपालांना करण्याचा निर्णय घेण्यात आला. (विशेष प्रतिनिधी)

 

Web Title: The spark of confrontation between the governor and the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.