स्वच्छतेचा संदेश देणारे बोलके आरसे

By admin | Published: September 1, 2016 05:17 PM2016-09-01T17:17:49+5:302016-09-01T17:17:49+5:30

देशभरात स्वच्छता अभियानाने जोर पकडला असताना विविध माध्यमाव्दारे स्वच्छतेचा संदेश दिला जातो.

Speaking of cleanliness | स्वच्छतेचा संदेश देणारे बोलके आरसे

स्वच्छतेचा संदेश देणारे बोलके आरसे

Next

गिरीश राऊत
खामगाव, (जि.बुलडाणा), दि. 1 - देशभरात स्वच्छता अभियानाने जोर पकडला असताना विविध माध्यमाव्दारे स्वच्छतेचा संदेश दिला जातो. मात्र शहरातील पंचायत समितीमधील ह्यआरसेह्ण सुध्दा बोलके झाले असून स्वच्छतेचा संदेश आहेत. ह्यस्वच्छता जेथे तेथे लक्ष्मी वसेह्ण ही म्हणच नाही तर वास्तव आहे. मात्र स्वच्छतेबाबत दुर्लक्षितपणा केल्या जात असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येते. त्यात शासकीय कार्यालय म्हटले की, कर्मचाऱ्यांसोबतच नागरिकांची वर्दळ आलीच. घर स्वच्छ ठेवताना आपण विचार करतो मात्र शासकीय कार्यालय सर्व नागरिक व कर्मचाऱ्यांचीच मालमत्ता असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळेच शासकीय कार्यालयाचे जिने व इमारतीमधील कोपरे म्हणजे आज पान, गुटखा, तंबाखू खावून पिचकारी मारण्याचे ठिकाण झाल्याचे अनेक कार्यालयातील चित्र आहे. असेच चित्र खामगाव येथील पंचायत समिती कार्यालयातही काही वर्षांपूर्वी दिसून येत होते. या कार्यालयात दररोज शेकडो कर्मचारी तसेच नागरिकांची विविध कामानिमित्ताने वर्दळ. अनेकांचे उपजीविका भागविणारे हे कार्यालय. त्यामुळे घराप्रमाणेच कार्यालय सुध्दा लखलखीत दिसावे प्रसन्न वातावरणामुळे कामामध्ये उत्साह वाढावा यासाठी पंचायत समिती कार्यालयाची नियमित रंगरंगोटी सुध्दा करण्यात येते. तर जास्त वापर असलेल्या जिन्यामधील भिंतींना खास करुन आॅईल पेंट मारण्यात आला आहे. मात्र जिन्यामधील भिंती ह्या पान, गुटखा व तंबाखूच्या पिचकारींनी रंगल्या जात. यामुळे दर्शनी भागातच घाण दिसून येत असे. आढावा तसेच पाहणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांसमोर हे बॅड इम्पे्रशन ठरत असे. त्यामुळे यावर उपाय म्हणून जिन्यातील भिंतीच्या कोपऱ्यावर ह्यआरसाह्ण लावण्याचा उपाय समोर आला व तत्कालीन गटविकास अधिकारी पी.आर.वाघ यांनी त्यास मूर्त रुप देत तात्काळ कार्यवाही करण्यात आली. यामुळे भिंतीवरील पिचकाऱ्या थांबल्या असून स्वच्छता राखण्यासाठी ही चांगली उपाययोजना करण्यात आली आहे.

आत्मचिंतनचाही देतात संदेश
साक्षरतेचे प्रमाण वाढले असतानाही अनेक साक्षरांची वर्तवणूक निरक्षरासारखी असते. येथे थुंकू नका असे लिहिलेले असताना विशेष करुन ते ठिकाण थुंकण्याचे ठिकाण होते असा सर्वत्र अनुभव. मात्र पंचायत समितीमध्ये जे थुंकण्याचे ठिकाण झाले होते तेथेच आरसे लावण्यात आल्याने त्या आरश्यामध्ये थुंकणाऱ्याला स्वत:ची प्रतिमा दिसते त्यामुळे स्वत:च्या प्रतिमेवर थुंकण्याचे टाळले जाते व यामधूनच स्वच्छता राखण्यास मदत होत आहे.सोबतच कार्यालयात जाण्याआधी आपली प्रतिमा पाहून कर्तव्याप्रति आत्मचिंतनाचा संदेश सुध्दा हे आरसे देत आहेत.

गुटखा, पानाच्या थुंकीचे डाग पुसण्यासाठी नेहमी कर्मचाऱ्यांना मेहनत घ्यावी लागत असे. तर ग्रामीण भागातील नागरिकांचा संबंध असणाऱ्या पंचायत समितीमधून स्वच्छतेचा संदेश गावागावात जाण्यासाठी पंचायत समितीमध्ये स्वच्छता असण्यावर भर दिला. भिंतीवर गुटखा खावून थुंकणाऱ्याला पोलिसांच्या ताब्यात देवून दंड सुध्दा ठोकण्यात आला होता.
- पी.आर.वाघ,
तत्कालिन गटविकास अधिकारी, पं.स.खामगाव

Web Title: Speaking of cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.